JOIN US
मराठी बातम्या / Viral / लोकांपासून इतका लांब जाऊन बसला की इंटरनेटवर VIDEO भन्नाट व्हायरल

लोकांपासून इतका लांब जाऊन बसला की इंटरनेटवर VIDEO भन्नाट व्हायरल

सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी एक तरुण सगळ्यांपेक्षा लांब जाऊन बसला आहे. याचा गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचा हा जीवघेणा संसर्ग कमी करण्यासाठी सोशल डिस्टंसिंग महत्त्वाचं आहे. पण अशात सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल झाल्या आहेत. यातच एक गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओला पंसदी देत लाईक केलं आहे. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी एक तरुण सगळ्यांपेक्षा लांब जाऊन बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही मित्र सहज बागेत फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एक अजब प्रकार दिसला आहे. ज्याचा मुलांनी व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

मित्रांनी पाहिलं की, एक मुलगा उंच झाडावर बसला आहे आणि सँडविच खात आहे. ही घटना इंग्लंडची असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा व्हिडिओ 33 वर्षीय Dai Barrow यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडिओला आतापर्यंत 17 हजार लोकांनी पाहिला आहे तर 243 लोकांनी याला शेअर केलं आहे. लोकांनी या व्हिडिओवर खूप मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. काही लोकांनी याला ‘जिनिअस’ असंही म्हटलं आहे. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी आणि कोरोनापासून लांब राहण्यासाठी तरुणाने अशी शक्कल लगावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या