JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / बाप रे! महिला पडली चक्क 'भुताच्या' प्रेमात, फसवणूक झाल्यानंतर करायचंय ब्रेकअप

बाप रे! महिला पडली चक्क 'भुताच्या' प्रेमात, फसवणूक झाल्यानंतर करायचंय ब्रेकअप

आतापर्यंत आपण भुतानं पछाडल्याच्या अनेक कथा ऐकल्या असतील पण भुताच्या प्रेमात कुणी पडेल आणि भुताकडून ब्रेकसाठी तगादा लावेल असा विचार तरी करता येईल का?

0106

आतापर्यंत आपण भुतानं पछाडल्याच्या अनेक कथा ऐकल्या असतील पण भुताच्या प्रेमात कुणी पडेल आणि भुताकडून ब्रेकसाठी तगादा लावेल असा विचार तरी करता येईल का? अनेक सिनेमांमध्ये भुतांच्या प्रेमात पडल्याचं किंवा मैत्री केल्याचं दाखवलं जातं पण प्रत्यक्षात असं घडत यावर विश्वास न बसण्यासारखाच आहे. मात्र इंग्लंड इथे अशी घटना समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
0206

पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण ब्रिटनमधल्या एका महिलेनं असा दावा केला आहे की ही महिला भुतासोबत रिलेशनमध्ये होती. ती भुतासोबत परदेशात मजा करायला गेली होती. मात्र आता तिला त्याच्यापासून सुटका हवी आहे.

जाहिरात
0306

ही महिला अनेक वर्षांपासून भुतासोबत रिलेशनमध्ये होती. या महिलेनं तिची सुट्टी देखील भुतासोबत घालवली होती आता तिला हे रिलेशन तोडायचं आहे म्हणून ती ब्रेकअपही करणार असल्याचं सांगितलं आहे.

जाहिरात
0406

ब्रिटनमधील एम्थिस्ट रिलाम नावाच्या महिलेने काही काळापूर्वी दावा केला होता की ती भुतासोबत रिलेशनमध्ये आहे. ही महिला या भुताच्या मुलाची आई देखील होऊ इच्छीते असा दावाही करण्यात आला होता. पण आता हे नात तिला नको असून संपवण्याबाबत ती सध्या विचार करत आहे. 2018 मध्ये एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात दावा केला होताा.

जाहिरात
0506

ज्या भुतासोबत रिलम रिलेशनमध्ये होती त्याच्यासोबत इंग्लंडमध्ये डेटही करत असल्याचा दावा तिने केला. थायलंडहून आल्यानंतर दोघांमधले संबंध बिघडले. त्याच्या वागण्यातले बदल जास्त जाणवायला लागले आणि त्यानंतर रिलमने त्याच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
0606

हे भूत आपल्यासोबत अनेक आत्म्यांना घरात घेऊन यायला लागले. ते ड्रग्स आणि पार्टी करायचे. घरभर गोंधळ घालायचे. त्याचं हे बदलत जाणारं वागणं महिलेला त्रासदायक ठरू लागलं. ज्यामुळे महिलेनं रागातून हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या