टेक्सास, 06 जुलै : आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अविस्मरणीय अशा क्षण असतो. त्यामुळे प्रत्येक जण हा क्षण जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो. अशातून गेल्या काही वर्षांपासून मॅटर्निटी फोटोशूटची (Maternity photoshoot) क्रेझ आहे. आपल्या बेबी बंपसह महिला फोटोशूट करतात. आतापर्यंत तुम्ही बरेच मॅटर्निटी फोटोशूट पाहिले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एका मॅटर्निटी फोटोशूटची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण या महिलेनं आपल्या पोटावर मधमाशा ठेवून फोटोशूट केलं आहे. टेक्सासमधील एका महिलेनं हे फोटोशूट केलं आहे. बेथानी कारूलक-बेकर असं या महिलेचं नाव आहे. ती मधमाश्यांचं पालनही करते. जवळपास 10 हजार मधमाश्या तिच्या पोटावर बसल्या आहेत आणि तिने पोझ देत आपले फोटो काढलेत.
महिलेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. अनेकांनी बाळाला धोका पोहोचेल याची चिंता व्यक्त केली. काहींनी या महिलेने डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही असं विचारत तिच्यावर टीकाही केली. हे वाचा - VIDEO : मोठमोठ्या बॉ़डी बिल्डरना टक्कर देतेय ही 24 वर्षांची तरुणी दरम्यान या महिलेनं आपल्या फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये तिनं असं फोटोशूट का केलं याचं कारण दिलं आहे. एका महिलेने फक्त पोटावर मधमाश्या ठेवून काढलेला हा फोटो नाही. तर असं फोटोशूट करण्यामागे एक मोठं कारण आहे, असं तिनं सांगितलं.
बेथानी म्हणाली, “गेल्या एका वर्षात मी गर्भपाताच्या वेदना सहन केल्यात. त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. काही महिन्यांनी मी पुन्हा गर्भवती राहिले. माझं बाळ मी पुन्हा गमावेत की काय अशी भीती मला वाटू लागली. ही भीती घालवण्यासाठी मी असं फोटोशूट केलं आहे. हे मॅटर्निटी फोटोशूट मला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला भविष्यात माझ्या गर्भात असलेल्या योद्धाची आठवण करून देईल” संपादन - प्रिया लाड