नवी दिल्ली,23 फेब्रुवारी: सध्या भारतात लग्नाचा (wedding season) मोसम सुरू आहे. या दरम्यान तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यातून बँड बाजाचा आवाज येईल. सोशल मीडियावर (social media) लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओही (videos) व्हायरल होतात. दरम्यान, एका वधूचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विदाईपूर्वीचा आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही तुमचं हसू रोखू शकणार नाही. 7 मित्र-मैत्रिणी मिळून देताहेत रडण्याची प्रॅक्टिस वधूच्या सात मित्र मैत्रिणी तिच्याकडून रडण्याची प्रॅक्टिस करुन घेत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र त्यानंतरही वधू रडत नाही. तर अश्रू काढण्याऐवजी तिनं दात काढले. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आता फारच कमी वधू निरोपाच्या वेळी रडतात आणि आनंदानं माहेरचं घर सोडतात. तर पूर्वीच्या नववधू विदाईच्या वेळी खूप रडायच्या. सासरी जाण्याआधी रडण्याचा प्रॅक्टिसचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक वधू लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये दिसत आहे. यादरम्यान तिचे मित्र मैत्रिणी तिला रडण्याचं शिकवताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नववधू आधी रडण्याचा प्रयत्न करते, पण खूप प्रॅक्टिस करूनही तिला कसं रडायचं ते कळत नाही आणि मग अश्रू काढण्याऐवजी ती जोरजोरात हसते. नववधूला हे करताना पाहून तिच्या मैत्रिणीही जोरजोरात हसू लागतात. व्हिडिओ पहा
वधू रडण्यात होते फेल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा नववधू रडण्याचा प्रयत्न करत असताना हार मानते तेव्हा ती थकते आणि तिचे हात पाय जोरात मारायला लागते. वधूचा हा मजेदार व्हिडिओ तिच्या मैत्रिणीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यासोबतच वधूची खिल्ली उडवत एक कॅप्शनही लिहिलं आहे. वधूनं कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा वधूला तिच्या लग्नात रडायला येत नाही, तेव्हा चांगले मित्र असे काही करतात.’