सुरत, 27 जुलै : जंगलाचा राजा सिंह आहे हे आपल्याला अगदी शाळेत असल्यापासून शिकवण्यात आलं आहे. जंगलातल्या त्या राजाने सर्व प्राणी किती घाबरतात, हे आपल्याला माहितीये..मात्र तो सिंह कोणाला घाबरतो हे मात्र तेव्हा कधी सांगितलंच नव्हतं. याचंच उत्तर तुम्हाला या व्हिडीओमधून मिळणार आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जंगलाची राणी सिंहिणी डरफाळी फोडत आहे. तिची डरकाळी इतकी मोठी आहे की सिंहही तिला घाबरला. तोदेखील सिहिंणीच्या समोर काहीच बोलू शकला नाही. शांत झाला तो आणि गपगुमान निघून गेला…या सिहिंणीची खरा आवाज ऐकायचा असेल तर हेडफोन लावा…तुम्हीही घाबराल. वाइल्ड इंडियाने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ गीरच्या जंगलातील असल्याचे सांगण्यात आले आहे. या वापरकर्त्यानेही व्हिडीओ पाहण्यापूर्वी हेडफोन लावण्याचं आवाहन केलं आहे. Zubin Ashara ने हा व्हिडीओ शूट केला आहे.
या व्हिडीओबरोबरच याच्या खाली आलेल्या कमेंट्सही खूप मजेशीर आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की जेव्हा महिला लढते तेव्हा सिंहही मागे होतो…हे वूमन पॉवर आहे…यानंतर अनेकांनी पती-पत्नीचे मजेशीर मीम्सही शेअर केले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सिहिंणीने सिंहाला गप्प केलं त्यावरुन पती-पत्नीशी तुलना केली जात आहे. काहींनी हे वूमन पॉवर म्हटलं आहे..