JOIN US
मराठी बातम्या / Viral / कमाल! आजीनं केला 85 फूट उंच पोलवर डान्स, काळजचा ठोका चुकवणारा VIDEO

कमाल! आजीनं केला 85 फूट उंच पोलवर डान्स, काळजचा ठोका चुकवणारा VIDEO

81 वर्षांच्या या महिलेचा डान्स पाहून उपस्थितांनी तोंडात बोटं घालणं फक्त बाकी होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : आपली छंद आणि कला जपणं कुणाला आवडत नाही. पण जसं वय वाढत जातं तशी ती आवड मागे राहाते. मात्र 81 वर्षांच्या आजींनी ही आवड आणि कसब अजूनही जपली आहे. आपल्यापैकी अनेक जणांना एका विशिष्ट्य वयानंतर सेवानिवृत्ती हवी असते. आरामदायी जगण्याचं स्वप्न असतं. अशा टप्प्यावर या आजींनी ऊर्जा आणि उत्साह वाढवण्याचं काम करत आहेत. त्यांच्या या कलेला तोडच नाहीय. 81 वर्षांच्या या महिलेनं 85 फूट लांब असलेल्या पोलवर चढून डान्स केला. त्यांच्यातली ऊर्जा आणि चैतन्य पाहून प्रेक्षकही अवाक झाले. हा थरारक अनुभव पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारा आला. 81 वर्षीय कार्ला वलेन्डाने 85 फूट लांबीच्या या पोल डान्सला उपस्थितांना कडक सॅल्युट केला आहे.

हे वाचा- बापरे! ज्वालामुखीच्या उद्रेकानं 5 किमीपर्यंत पसरला अंधार…पाहा थरारक PHOTOS स्टीव हार्वे यांचा शो लिटिल बिग शॉट्स: फॉरएव्हर यंग यामध्ये या महिलेची करामत पाहून प्रेक्षकांच्या काळजात धस्स झालं आणि कौतुकही वाटलं. या शोमध्ये वयोवृद्ध देखील सहभागी होत असतात. त्यांच्या कला, डान्स इत्यादी सादर करून दाखवतात. 81 वर्षांच्या महिलेनं कमाल पोल डान्स केला आहे. महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘यातून मी लोकांचं मनोरंजन करते. धाडसी असलं तरीही मला हे करायला आवडतं. मी वयाच्या 3 वर्षांपासून पोल डान्स करते’, असंही कार्ला यांनी सांगितलं. कार्ला वालेंडा या महिलेचा हा पोल डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या