JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video : फ्रिजमध्ये माणसाचं कापलेलं डोकं, दार उघडताच तरुणाची भयंकर अवस्था

Video : फ्रिजमध्ये माणसाचं कापलेलं डोकं, दार उघडताच तरुणाची भयंकर अवस्था

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Ajab Gajab News: तुम्ही सोशल मीडियावर (Video Viral On Social Media) अनेक व्हिडीओ पाहिले असतील. यातील काही प्रँक व्हिडीओदेखील (Prank Video) असतात जे पाहून भीतीही वाटते. आज असाच एक प्रँक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहताना अनेकांना भीती वाटेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भयंकर प्रँक व्हिडीओ… व्हिडीओ पाहताना तुम्हाला भीतीही वाटू शकतो. मात्र हा एक प्रँक आहे, हे लक्षात ठेवा. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच एक व्यक्ती काचेच्या बरणीत फोटो लावत आहे. यानंतर बरणीच्या वरच्या बाजूला तो टोमॅटो सॉस शिंपडतो. व्हिडीओ लक्ष देऊन पाहिल्यानंतर ते एका व्यक्तीचं सीर असल्याचं वाटतं. यानंतर ती व्यक्ती काचेची बरणी फ्रीजमध्ये ठेवते आणि बाहेर निघून जाते. यानंतर त्याचा मित्र खोलीत येतो. तो फ्रिज उघडतो, तर त्याला धक्काच बसतो. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, त्याचा मित्र मागच्या मागे पडतो. हे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला.

व्हिडीओ होतोय व्हायरल.. हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आला आहे. James Van den Bergh नावाच्या युजरने हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओला आतापर्यंत 4.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हजारो लोक या व्हिडीओवर कमेंट करीत आहेत. अनेकांनी अशा प्रकारच्या मजा-मस्तीवर नाराजी व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या