JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : आक्रोश..किंकाळ्या...एका क्षणात अख्खं गाव गेलं पाण्याखाली; पुरात दोघेजण गेले वाहून

VIDEO : आक्रोश..किंकाळ्या...एका क्षणात अख्खं गाव गेलं पाण्याखाली; पुरात दोघेजण गेले वाहून

आपलं घर पाण्याखाली जात असल्याचे पाहून त्यांनाही आपला आक्रोश थांबवता आला नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अरुणाचल प्रदेश, 20 सप्टेंबर : यंदाच्या वर्षात कोरोनाबरोबरच पावसानेही नागरिकांना झोडपलं. या पावसामुळे अनेकांचं घर उद्ध्वस्त झालं. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधील नागरिकांचा आक्रोश, किंकाऱ्या ऐकून अंगावर काटा येईल. आपल्या डोळ्यासमोर घर पाण्यात विसर्जित होताना पाहून कोणाचाही स्वत: वर ताबा राहणं कठीण आहे. हा व्हिडीओ अरुणाचलमधील लेपार्डा जिल्ह्यातील आहे. येथील ईगो नदीला आलेल्या पुरामुळे अख्ख गाव पाण्याखाली गेलं. ही घटना गुरुवारची असून दरड कोसळल्यामुळे नदी पात्रात मोठा ढिगारा जमा झाला. यानंतर गावात पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोघेजण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय ईगो नदीवर बांधलेला पुलही उद्ध्वस्त झाला आहे.

संबंधित बातम्या

हे ही वाचा- नागपूर हादरलं! अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू, पाहा PHOTO याशिवाय अनेक घरांमध्ये पाण्याचा लोट जात असलेला हा व्हिडीओ पाहून भीती वाटते. या घटनेनंतर मृतांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. या पूरपरिस्थितीमुळे बसार व लिखाबाली येथील रस्ते संपर्क तुटला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी आपल्या फेसबूकवरुन या अपघातात मृत्यू झाल्यामुळे दु:ख व्यक्त केलं आहे. व्हिडीओ करणारे येथील गावातील असल्याचे सांगितले जात आहे. डोंगरावरुन पाण्याचा लोट येताच व्हिडीओ घेणाऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या महिला ओरडू लागल्या. आपलं घर पाण्याखाली जात असल्याचे पाहून त्यांनाही आपला आक्रोश थांबवता आला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या