टेलिव्हिजन वरील फेमस शो ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ फेम दयाबेनची मिमिक्री करणाऱ्या या 9 वर्षीय लहान मुलीचा व्हिडिओ पाहिलाच असेल. कोण आहे ही?
टेलिव्हिजन वरील फेमस कॉमेडीयन शो 'तारक मेहता का उलटा चश्मा' फेम दयाबेन म्हणजेच आपली सर्वांची लाडकी ( Disha Vakani ). आणि या दयाबेन ची ॲक्टिंग कोणाला आवडत नाही. तिचीच मिमिक्री करणाऱ्या या 9 वर्षीय लहान मुलीचा व्हिडिओ पाहिलात का!
दयाबेन अर्थातच ( Disha Vakani) सोबत या मुलींनं कंगना रणौतला सुद्धा काही मागे सोडलं नाही आहे. तिनं फेमस अभिनेत्री कंगनाची देखील काय ॲक्टिंग केलीय. जणू काही हुबेहूब कंगणाच.
इंस्टाग्राम आणि यूट्यूब वर आपल्या अभिनयाची जादू दाखवून जिनं आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर पडली आहे, ती पंजाब मध्ये राहणारी सुमन पुरी आहे. सुमन ही अवघ्या 9 वर्षाची आहे. एवढ्या लहान वयात तीनं आपल्या अभिनयातून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
सुमन पुरी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती आपले ॲक्टिंग चे व्हिडिओ आणि फोटोज इंस्टाग्राम वर शेअर करत असते.
एवढ्या लहान वयात अगदी हुबेहूब कलाकारी ॲक्टिंग करत या मुलीनं सर्व सोशल मीडिया चाहत्यांचे मन जिंकले आहेत. संपूर्ण सोशल मीडियावर तिच्या या ॲक्टिंग ची सर्वजण कौतुक करत आहेत.
तिच्या या ॲक्टिंग समोर भल्या भल्या अभिनेत्री फेल आहेत. तिच्या या अभिनयाचे कौतुक करत तिचे सर्वजण फॅन झाले आहेत.