मुंबई, 31 मे : सोशल मीडियावर एका व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. जंगलाचा राज सिंह शिकारीच्या शोधात असलेल्या सिंहाने म्हशीवर हल्ला केला. सिंहाच्या हल्ल्यातून म्हशीनं आपला जीव वाचवला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडिओ सुशांत नंदा याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सिंह हा मानवाच्या दृष्टीने जंगलाचा राजा असला तरी ही म्हैस या सिंहला राजा म्हणून माफ करणार नाही”. हा व्हायरल व्हिडीओही चर्चेत आहे कारण आपण बर्याचदा म्हशीची शिकार करताना पाहिले आहे. पण या व्हिडीओमध्ये सिंहाच्या तोंडातून शिकार सोडावी लागली आणि सिंहालाही शिकार करताना लागलं.
सिंह आणि म्हैस यांच्यात झालेल्या शिकारीचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा प्रकारचं दृश्यं फार दुर्मीळ पाहायला मिळतं असं युझर्सचं म्हणणं आहे. 9.161 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 170 युझर्सनी रिट्वीट केला आहे. म्हशीनं सिंहाला चांगली अद्दल घडवली, म्हशीनं आपली सुटका करून घेतल्याचंही अनेक युझर्सनी म्हटलं आहे.