नवी दिल्ली, 12 जून : एखाद्या प्राण्याला आपण थोडा जरी जीव लावला तरी तो आपल्याला प्रेम करतो. मग तो कितीही मोठा प्राणी असला तरी मायेपुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरं आहे. असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर माणूस आणि जनावरांमधील प्रेमाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याच्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी प्रवीण यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुमारे तीन बिबट्यांच्या मागे एक व्यक्ती चादर घेऊन झोपला आहे. दरम्यान, एक बिबट्या उठून आजूबाजूला पाहतो. बिबट्याला पाहून तो माणूस त्याला मोठ्या प्रेमाने हाक मारतो आणि विनवण्या करतो. यानंतर एक बिबट्या चादरीमध्ये झोपण्यासाठी जातो. एका बिबट्याने हे केल्यावर इतर बिबट्याही उठतात आणि त्याच प्रकारे त्या व्यक्तीवर प्रेम करण्यास सुरुवात करतात.
हा व्हिडिओ पोस्ट करताना प्रवीण यांनी दिलेलं कॅप्शनही गंमतीदार आहे. त्यांनी लिहलं की, ‘एखाद्या बिबट्याला काय आवडतं, गरम कपडे की कोमल भावना. तर त्यांना प्रेमाची गरज आहे.’ या एक मिनिट 58 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाईक मिळाले आहेत. हा व्हिडिओ जो तो बिबट्या आणि माणसांमधील या नात्याचं कौतूक करत आहे.