JOIN US
मराठी बातम्या / Viral / JCB, पाकचा रागावलेला चाहता ते पॅराग्लायडिंगवाला व्हिडिओ; 2019 मध्ये या ट्रेंडने तुम्हाला खळखळून हसवलं

JCB, पाकचा रागावलेला चाहता ते पॅराग्लायडिंगवाला व्हिडिओ; 2019 मध्ये या ट्रेंडने तुम्हाला खळखळून हसवलं

2019 या वर्षांत जेसीबी, टेन इयर चॅलेंज, पाकिस्तानचा रागावलेला चाहता, पॅराग्लायडिंग व्हिडिओ, रानू मंडल, कांद्याच्या किंमती याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नव्या वर्षाच्या स्वागताला फक्त एक आठवडा बाकी राहिला आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी करत आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जोक व्हायरल झाले. पावसाने गणपती, दिवाळी आणि आता नाताळही साजरा केल्याचं सांगणारे मीम शेअर झाले. खरंतर या वर्षात असे अनेक ट्रेंड आले ज्याने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला. काही ट्रेंड का आणि कुठून आले हे सुद्धा माहिती नसताना युजर्सनी त्याचे मीम शेअर केले. यामध्ये जेसीबी, टेन इयर चॅलेंज, पाकिस्तानचा रागावलेला चाहता, पॅराग्लायडिंग व्हिडिओ, रानू मंडल, कांद्याच्या किंमती याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली. 2019 या वर्षाच्या सुरुवातीलाच टेन इयर चॅलेंजचा हॅशटॅग ट्रेंड झाला. त्यानंतर लोकांनी दहा वर्षांपूर्वीचा आपला फोटो आणि आताचा फोटो शेअर केला. त्यानंतर अनेक मीम व्हायरल झाली.

दहा वर्षांत काय बदललं आणि काय नाही हे शेअर केलं गेलं. यात अभिनेता अनिल कपूरचा फोटो मात्र दहा वर्षांनीही तसाच दाखवण्यात आला होता.

संबंधित बातम्या

जेसीबीकीखुदाई हा ट्रेंड 2019 मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला होता. कधी आणि केव्हा सुरु झाला हे अनेकांना माहिती नाही पण याची भूरळ अनेकांना पडली. ट्विटर, फेसबुक, युट्यूबसह टिकटॉकवरही जेसीबी फोटो आणि व्हिडिओने धुमाकूळ घातला.

जाहिरात

काही युजर्सनी सनी लिओनीने फोटो शेअर केल्यानंतर हा ट्रेंड सुरू झाल्याचं म्हटलं होतं.

जाहिरात

आयसीसी वर्ल्ड कप वेळी अनेक फोटो, व्हिडिओ शेअर झाले. पण यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाकिस्तानच्या सामन्यात पाकच्या चाहत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड गाजला.

जाहिरात

संघाकडे रागाने पाहणाऱ्या या चाहत्याचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला. आयसीसीने एक लहान व्हिडिओ क्लिप ट्विटरवरून शेअर केली होती.

जाहिरात

वर्षभर चर्चेत राहिलेला आणि धुमाकूळ घातलेला व्हिडिओत पहिल्यांदाच पॅराग्लायडिंग करणाऱ्या एका व्यक्तीचा.

पॅराग्लायडिंग करत असताना भीतीने थरकाप उडालेला तरूण इन्स्ट्रक्टरला वारंवार खाली उतरव, पाहिजे तर जास्त पैसे घे पण उतरवं असं म्हणत होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

वर्षाअखेरीच कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. त्यानतंर कांद्याच्या किंमतीवरून अनेक जोक, मीम्स व्हायरल झाले होते.

काही व्हिडिओसुद्धा तयार करण्यात आले होते. त्यामध्ये कोणी सुटकेसमध्ये भरून कांदे आणतो तर हॉटेलात खाद्यपदार्थ दिल्यानंतर फक्त कांद्याचा वास दिला जातो.

याशिवाय आणखी काही मीम्स तयार झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या