JOIN US
मराठी बातम्या / Viral / फोन अन् इंटरनेटपासून काही काळ दूर जायचंय? मग 'या' तीन ठिकाणांना नक्की भेट द्या

फोन अन् इंटरनेटपासून काही काळ दूर जायचंय? मग 'या' तीन ठिकाणांना नक्की भेट द्या

अलीकडे डिटॉक्स व्हेकेशनचा ट्रेंड सुरू झाला आहे. ज्यामध्ये फोनचं इंटरनेटबंद ठेवून फिरायला जाण्यास प्राधान्य दिलं जातं, चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 20 ऑक्टोबर : सध्या सोशल मीडिया चा जमाना आहे. जवळपास प्रत्येक व्यक्तीचं एखाद्या तरी सोशल मीडिया साईटवर अकाउंट आहे. त्या ठिकाणी अनेकजण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी पोस्ट आणि शेअर करतात. काही जणांना तर सोशल मीडियाची इतकी आवड आहे की, दिवसभरात आपण काय-काय केलं याचेदेखील अपडेट ते सोशल मीडियावर देतात. सोशल मीडियाशिवाय ऑनलाइन गेमिंग या आणखी एका गोष्टीसाठी लोक तासन् तास आपला मोबाईल फोन हातात घेऊन बसलेले दिसतात. विशेषत: तरुणाईचं प्रमाण यामध्ये जास्त आहे. आजकाल लोकांना फोनची आणि इंटरनेटची इतकी सवय झाली आहे, की ते बाहेर फिरायला गेल्यानंतरही सतत फोनमध्येच व्यस्त असतात. मात्र, फोनचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, याची आता हळूहळू जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे अलीकडे डिटॉक्स व्हेकेशनचा ट्रेंड सुरू झाला आहे. ज्यामध्ये फोनचं इंटरनेटबंद ठेवून फिरायला जाण्यास प्राधान्य दिलं जातं. भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथं तुम्ही इंटरनेट बंद ठेवून सहलीचा आनंद घेऊ शकता. ज्यांना इंटरनेटशिवाय काही दिवस लाईफ एंजॉय करायचं आहे, त्यांनी खाली दिलेल्या तीन ठिकाणांना भेट दिली पाहिजे चितकुल, हिमाचल प्रदेश: चितकुल हे हिमाचल प्रदेश राज्यातील किन्नौर जिल्ह्यातील एक छोटंस गाव आहे. हे गाव भारतीय सीमाभागातलं शेवटचं गाव मानलं जातं. शिमला आणि मनालीच्या ट्रीपदरम्यान या सुंदर गावाला भेट देता येते. या गावाला नैसर्गिक सौंदर्याची देणगी लाभलेली आहे. येथील नयनरम्य निसर्गामुळे तुमच्या ट्रीपमध्ये आणखी मजा येईल. आईस किंग्डम, झंस्कार, काश्मीर: काश्मीरला भारताचा स्वर्ग मानलं जातं. बर्फाच्छादित असलेल्या काश्मीमध्ये आईस किंग्डम अस्तित्वात आहे. कारगिल जिल्ह्यातील झंस्कार व्हॅलीतील या आईस किंग्डमचं सौंदर्य तुम्हाला भुरळ घालेल. या ठिकाणी फिरताना तुम्ही फोन, इंटरनेट सगळं काही विसरून जाल.

चांगलांग, अरुणाचल प्रदेश: अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वांत सुंदर राज्यांपैकी एक आहे. येथे अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांचं सौंदर्य एखाद्या हिल स्टेशनपेक्षा कमी नाही. चांगलांग हे असंच एक हिल स्टेशन आहे. येथील निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही तुमचं डिटॉक्स व्हेकेशन संस्मरणीय करू शकता. सतत फोन आणि इंटरनेटचा वापर करून तुम्ही वैतागला असाल तर तुम्ही वरील तीन ठिकाणी जाऊ शकता. तिथे निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला इतर सगळ्या गोष्टींचा विसर पडेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या