Image credits : Screenshot of videos.
सोशल मीडियावर (Social Media) कधी कोणतं Challenge येईल सांगता येत नाही. एकदा हे Challenge आलं की ते झपाट्याने व्हायरल होतं, त्याची भुरळ सर्वांनाच पडते. चॅलेंजच्या माध्यमातून हा होईना सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याची संधी कोणीच सोडत नाही. मात्र यातील काही चॅलेंज जीवावर बेतणारेही असतात. सध्या Tiktok वर असाच एक Danger challenge व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये युझर्झ (users) आपल्या डोळ्यांशी खेळत आहे आणि यामुळे कदाचित त्यांच्या डोळ्यांची दृष्टी जाण्याचीही शक्यता आहे. हा TikTok challenge आहे चो म्हणजे ’eye challenge’ काय आहे ’eye challenge’? यामध्ये युझर्स आपल्या डोळ्यांच्या बाहुलीवर (eyeballs) मोबाइल फोनच्या फ्लॅश मारून व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत आणि TikTok च्या S5 फिल्टरचा वापर करून डोळ्यांचा रंग बदलत आहेत. मिरर यूकेच्या (Mirro UK) रिपोर्टनुसार, हा ट्रेंड एक टिकटॉक युझर मालियाब्रू (Maliabroo) पासून सुरू झाला. जिने व्हिडिओ (video) शेअर करताना दावा केला आहे की, जर कुणाचे डोळे Brown असतील तर टिकटॉकचे S5 फिल्टरमुळे त्याचे डोळे Blue दिसतील. या व्हिडिओत मुलीने आपल्या डोळ्यांचा रंग बदलल्याचंही दाखवलं आहे.
@3ys7pb6n change ur eye color w 1 filter!! i always use this #browneyes #blueeyes #s5 #foryoupage #duetthis ♬ filter eyes trend - vvaalentinnaa
यानंतर या व्हिडिओसह हा चॅलेंज झपाट्यानं पसरला आणि युझर्स ते स्वीकारू लागले. काही युझर्सनी TikTok वरील हे eye challenge एखाद्याला आंधळं करेल असा धोक्याचा इशाराही दिला आहे.
@ammadaniela Imagine if every brown eyed person out there liked this… (I went blind for this) #browneyes #eyes ♬ bellyache (Marian Hill Remix) - Billie Eilish
Mirro UK च्या रिपोर्टनुसार, TikTok मधील S5 प्री-सेट फिल्टर आहे, ज्यामुळे डोळे ब्लू दिसतात. खरोखर डोळ्यांचा कलर बदलत नाही.