JOIN US
मराठी बातम्या / Viral / वा रे गड्या! वाघालाही घाबरला नाही बैल; गायीचे लचके तोडताना शेजारीच होता उभा, पाहा VIDEO

वा रे गड्या! वाघालाही घाबरला नाही बैल; गायीचे लचके तोडताना शेजारीच होता उभा, पाहा VIDEO

हा व्हिडीओ एकदा पाहाच..

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरेली, 8 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहतो, अनेक मजेशीर असतात. काही मात्र तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. अशीच एक घटना अमरेली येथे घडली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये 3 वाघांनी एका गायीची शिकार केली. हे तिनही वाघ एकत्रितपणे या गायीचे लचके तोडत होते. असे असतानाही बैल वाघांच्या शेजारीच उभा होता. अमरेलीतील जाफराबाद भागातील हा व्हिडीओ तुम्हाला अनेक गोष्टींची आठवण करु देतो.

येथील गावकऱ्यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. त्यानंतर कोणीतरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. काही वेळात हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ काही अस्पष्ट असला तरी बैल शेजारी उभा असल्याचे दिसत आहे. अनेकदा हिंस्त्र प्राणी पाहून बैल, गायी तेथून पळ काढतात. मात्र येथे तर वाघांनी गायीची शिकार करुन तिचे लचके तोडत आहे. असे असतानाही बैल तेथून पळाला नाही, आणि नाही घाबरला..तो तेथेच उभा होता. ही गाय त्या बैलासोबतच रानात चरण्यासाठी आली असण्याची शक्यता आहे. त्याचवेळी तेथे वाघ दबा धरून बसले होते, त्यातच त्यांनी गायीची शिकार केली. यात बैल वाचला तरी तो तेथेच उभा राहिला. बैल उभा असताना वाघ मात्र गायीचे मांस खाण्यात व्यस्त होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या