JOIN US
मराठी बातम्या / Viral / ऑनलाइन क्लासमध्येच 59 वर्षाच्या शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, पॉर्न साईट पाहून...

ऑनलाइन क्लासमध्येच 59 वर्षाच्या शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, पॉर्न साईट पाहून...

या शिक्षकाचे वय 59 वर्ष आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Viral News : 2020 मध्ये भयानक असे कोरोनाच्या रुपाने महासंकट संपूर्ण जगावर आले होते. त्यामुळे कोरोनाकाळात बचावासाठी जगातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, या कालावधीत मुलांचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीने होत होते. मात्र, जेव्हा कोरोना रुग्णसंख्या कमी व्हायला लागली तेव्हा हळूहळू शाळा उघडण्यात येऊ लागल्या. तसेच गेल्या वर्षी शिक्षक ऑनलाइन वर्गात काय करत होते, त्यांचे कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. याच्याशीच संबंधित एक धक्कादायक प्रकार ब्रिटनमधील एका शाळेतून समोर आला आहे. येथील एक शिक्षक मुलांना शिकवण्याऐवजी पॉर्न साइट्स पाहत होता, अशी माहिती समोर आली आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द मिररने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी व्याकरण शिकवणारे शिक्षक डेव्हिड चिडलो यांना आता निलंबित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यानच्या शालेय शिक्षणादरम्यान त्यांनी एका पॉर्न वेबसाईटवरील महिलांचे प्रोफाइल 74 वेळा पाहिल्याचे तपासात समोर आले आहे. शाळेला संशय आल्याने त्यांच्या लॅपटॉपवर नजर ठेवण्यात आली. यासोबतच विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतिक्रियाही घेण्यात आल्या. महिलांच्या प्रोफाईल पाहायचा - मिळालेल्या माहितीनुसार, या शिक्षकाचे वय 59 वर्ष आहे. ते बिझनेस स्टडीज आणि इकॉनॉमिक्स शिकवतात. ते शाळेत सप्टेंबर 2018 पासून काम करत होते. त्यांनी ऑनलाईन क्लासेसच्या दरम्यान पॉर्न साईट्स पाहिल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. तसेच त्यांनी सांगितले की, ते मायक्रोसॉफ्ट वर क्लास घेत होते. तसेच यादरम्यान, मध्ये मध्ये ते पॉर्न वेबसाईटवर जाऊन महिलांच्या प्रोफाईल तपासत होते. महिलांना मागितले फोटो - चिडलोने कबूल केले की ते ईमेलद्वारे वेबसाइटवर महिलांशी संवाद साधत होता. शिवाय त्यांच्याकडून अॅडल्ट फोटो मागवायचे. या सुनावणीत असे सांगण्यात आले की शाळेने चिडलोच्या लॅपटॉपचे त्याच्या पूर्व माहितीशिवाय रिमोट मॉनिटरिंग केले. मे 2021 मध्ये औपचारिक शिस्तभंगाची सुनावणी झाली आणि चिडलोला गंभीर गैरवर्तनासाठी डिसमिस करण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या