JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : 32 कोटींची लॉटरी लागल्यानंतर लाईव्ह कार्यक्रमातच पत्रकारानं बॉसला दिला राजीनामा आणि...

VIDEO : 32 कोटींची लॉटरी लागल्यानंतर लाईव्ह कार्यक्रमातच पत्रकारानं बॉसला दिला राजीनामा आणि...

अरे देवा, राजीनामा देण्याआधी या पत्रकारानं केलेल्या चुका कधी करू नका. त्यासाठी पाहा हा VIDEO.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्रिटन, 27 डिसेंबर : कोट्यवधींची लॉटरी लागल्यानंतर अर्थातच कोणी नोकरी करण्याचा विचार करत नाही. पण एका पत्रकारानं चक्क 32 कोटींची लॉटरी लागली म्हणून लाईव्ह सामन्यातच राजीनामा दिला. जुबिलेंट स्पॅनिश टीव्ही रिपोर्टरचा राजीनामा जगभरात व्हायरल होत आहे. खरं तर, तिनं एक लॉटरी खरेदी केली होती आणि जेव्हा तिच्या विजेत्याचे नाव जाहीर होते तेव्हा ती कार्यक्रमात लाईव्ह रिपोर्टिंग करत होती. लॉटरीमधील तिचा नंबर असल्याचे नतालिया एस्कुडेरोला समजताच तिने आनंदाने राजीनामा दिलाया सोडतीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 3.4 दशलक्ष पौंड (सुमारे 31.45 कोटी रुपये) होते. मात्र ज्या पध्दतीनं नतालियानं राजीनामा दिला, त्यामुळं हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाचा- ‘भयानक आहे हे, तरीही रोज जगावं लागतं’… भीषण VIDEO वर मराठी अभिनेत्याची खंत नतालियानं टीव्हीसमोर येताच बॉसला, मी उद्यापासून कामावर येत नाही, असे सांगितले. या कार्यक्रमाचा लाईव्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नतालियाच्या राजीनाम्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ख्रिसमसच्या ड्रॉची विजयी संख्या जाहीर होताच नतालिया आनंदाने उडी मारते आणि मुठ थांबते आणि हवेत झेप घेते. प्रसारणादरम्यान ती आनंदी आहे आणि ती आपल्या मित्रांना सांगते की उद्यापासून मी कामावर येणार नाही. वाचा- अरे आवरा! व्हायरल होतोय Jingle Bellsचा पुणेरी पॅटर्न, ढोल-ताशांवरचा VIDEO बघाच

वाचा- छोटा ब्रुस ली, 1 मिनिटात फोडल्या 125 टाईल्स! पाहा हा VIDEO दरम्यान, आपली चूक कळल्यानंतर नतालियानं राजीनामा मागे घेतले. खरं तर, उघडलेल्या सोडतीतून त्याला फक्त 4285 पाउंड (3.96 लाख रुपये) मिळणार आहेत. रिपोर्टर नतालिया पुन्हा टीव्हीवर दिसली आणि तिच्या भावनिक वर्तनामुळे आणि व्यावसायिक कमतरतेबद्दल तिने आपल्या प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त केली. तिने ट्विटरवर प्रेक्षकांसाठी लिहिलं आहे की गेली 25 वर्षे ती पत्रकाराच्या रूपात कठोर परिश्रम करत होती आणि तिच्या या कामाचा मला अभिमान आहे. तिने सांगितले की ती गेल्या काही महिन्यांपासून ‘कठीण’ अवस्थेतून जात होती आणि सुट्टीची योजना आखत होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या