मुंबई, 7 ऑक्टोबर : गुंतवणुकीबाबत आज लोक जागरूक झाले आहेत. अनेक ठिकाणी लोक गुंतवणूक करत असतात; मात्र प्रॉपर्टीमध्ये (property) गुंतवणूक करण्याकडे कल अधिक असतो. याचं कारण म्हणजे खूप कमी कालावधीत प्रॉपर्टीमधल्या गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स मिळतात. भारतात जमीन, घर खरेदी करून अनेक जण गुंतवणूक करतात; मात्र परदेशात तुम्हाला बहुतांश बांधलेली घरं (houses) विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं आढळेल. ब्रिटनमधल्या वेल्स इथल्या स्नोडोनिया (Snowdonia) येथे एक सुंदर छोटं घर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. घर दिसायला लहान आहे आणि त्याची किंमत खूप जास्त आहे. वेल्समध्ये विक्रीसाठी असलेलं हे घर पर्यटकांसाठी स्वर्ग असल्याचं मानलं जातं. येथे बसून आपण तलाव आणि पर्वत पाहण्याचा आनंद घेऊ शकता; पण बरीच जागा असलेलं आणि मोकळं फिरण्यासारखं घर तुम्ही शोधत असाल, तर हे घर तुमच्यासाठी नाही. वास्तविक, किमतीनुसार हे घर खूपच लहान आहे. हे झोपडीवजा घर खरेदी करण्यासाठी तब्बल 36 लाख रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय या घराच्या आत शौचालयही नाही. या झोपडीत प्रवेश करताच हॉलमध्ये दोन सोफे दिसतील. याशिवाय, भिंतीवर बसवलेलं कपाट आणि आर्मचेअरदेखील मिळेल. बेडरूम अगदी त्याच्या शेजारी आहे. बेडरूमबाबत अनेकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या; पण बेडरूम पाहून प्रत्येकजण निराश होत आहे. बेडरूम खूपच लहान आहे. यामध्ये बेड मिळेल, पण तोही फोल्डेबल. जेव्हा तुम्ही झोपेतून उठाल, तेव्हा बेड फोल्ड करून ठेवावा लागेल. तरच बेडरूममध्ये जागा तयार होईल.
लहान असूनही आपण हे घर घेऊ इच्छित असाल, तर त्यात अनेक कमतरतादेखील आहेत. या ठिकाणी सध्या पाण्याचं कनेक्शन नाही. येथे तुम्हाला बेडरूमच्या बाहेर एक सिंक मिळेल. याशिवाय एक फ्रीजदेखील आहे. त्याच्या समोर एक गेट आहे, जे बागेच्या दिशेनं उघडतं. येथून तुम्हाला तलाव आणि टेकडी पाहायला मिळेल. याशिवाय या झोपडीत शौचालय नाही. म्हणजेच तुम्हाला त्यासाठी घराबाहेर जावं लागेल.
हे घर इस्टेट एजंट बॉब पॅरी यांच्या मालकीचं आहे. बॉब यांनी सांगितलं, की तुम्हाला ही झोपडी खरेदी करायची असेल तर तुम्ही 12 नोव्हेंबरपर्यंत अनौपचारिक निविदा त्यांच्या Carnarphone कार्यालयात जमा करू शकता. लहान झोपडी असूनही आत पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नसतानाही अनेक लोक ती खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. अशा परिस्थितीत कोणालाही ते खरेदी करायचं असेल, तर 12 नोव्हेंबरपर्यंत त्यासाठी अर्जही करू शकता. Keywords :