JOIN US
मराठी बातम्या / Viral / वाघाच्या तावडीत सापडलाच होता वानर तेवढ्यात... हृदयाचा ठोका चुकवणारा Video

वाघाच्या तावडीत सापडलाच होता वानर तेवढ्यात... हृदयाचा ठोका चुकवणारा Video

हा व्हिडिओ जुना असून, तो आएएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर केला आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 23 डिसेंबर : आपल्याला माहीत आहे की, वाघ हा आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघाची ताकद ही प्रचंड असते. त्यामुळे त्याच्या आसपासही कोणी जात नाही आणि गेलाच तर त्याचे काय होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ फिरत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडियो फार चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये असे काय आहे, ज्यामुळे तो येवढा व्हायरल झाला आहे ते आपण जाणून घेऊया. हा व्हिडिओ जुना असून, तो आएएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर केला आहे व “हालात के शिकार” असे व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसतं की, एक वाघ झाडावर चढत आहे. त्याच झाडावर एक माकड आरामात बसलेलं आहे. हे ही पाहा : कॅमेरामनच्या कृतीने मगरीला आला राग, पाण्यातून उडी मारली आणि… पाहा व्हिडीओ वाघ झाडावर चढत आहे तरीदेखील माकड मात्र आपलं निवांत बसलेलं आहे. जणू त्याला वाघाची काहीच भीती वाटत नाहीये. पण माकडाने आपली एक योजना आखलेली आहे. त्या योजनेच्या मदतीने तो वाघाला स्पर्श न करता झाडावरुन खाली पाडतो. वाघ झाडावर चढल्यानंतर माकडाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. माकड त्याला आपल्या जवळ येऊ देतं व झाडाची फांदी हलवायला लागतं. तेंव्हा वाघ फांदीवरील आपली पकड पक्की करण्याचा प्रयत्न करतो. पण तो माघार घेत नाही, तो माकडावर झडप मारण्याच्या तयारीत असतो. जशी झडप मारतो तसे माकड बाजूला होतं. वाघ मात्र झाडाच्या फांद्यांमध्ये अडकतो व घसरत घसरत खाली जमिनीवर पडतो. जमिनीवर पडल्यावर वाघ तसाच बसून राहतो, असं या व्हिडिओत दिसतंय.

संबंधित बातम्या

हा व्हिडिओ 2 मिनिटं, 12 सेकंदांचा असून, फारच मजेशीर आहे. सोशल मीडियात या व्हिडिओवर अनेक युजर व्यक्त होत आहेत. एका युजरने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, “पडल्यानंतर वाघ उठतही नाही, कारण बिचारा खूप थकला आहे.” तर दुसरा युजर लिहतो, “शिकार व शिकारी या दोघांचाही हा जगण्यासाठी संघर्ष आहे, जय-पराजय हे तर परिस्थितीचा एक भाग आहेत.” तसंच एका युजरने लिहलं आहे की, “एकीकडे राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाला उपाशी रहावं लागलं तर दुसरीकडे माकडाला नवीन जीवन मिळालं.” हे ही पाहा : मेलेल्या सापाचं विष धोकादायक असतं? सापाचे काही Unknown Fact अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये शिकार असलेलं माकड व शिकारी असलेला वाघ यांचा जगण्याचा संघर्ष पहायला मिळतो. एकीकडे भूकेला वाघ आपली भूक भागवण्यासाठी माकडाच्या मागे लागलेला असतो तर आपला जीव वाचविण्यासाठी माकड वाघाला चुकवण्याचा प्रयत्न करतंय. हा जीवनाचा अर्थच म्हणता येईल की, एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या