JOIN US
मराठी बातम्या / Viral / हा पूल आहे की चमत्कार! धावत्या गाड्या अचानक होतात गायब, Video पाहून व्हाल चकित

हा पूल आहे की चमत्कार! धावत्या गाड्या अचानक होतात गायब, Video पाहून व्हाल चकित

अनेकवेळा इंजिनीअरिंगचे असे नमुने पाहायला मिळतात, जे पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही.

जाहिरात

व्हायरल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जानेवारी : काळाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानानेही बरीच प्रगती केली आहे. ज्या गोष्टींची आपण कल्पनाही करू शकत नव्हतो, त्या आज घडत आहेत. यामुळेच अनेकवेळा इंजिनीअरिंगचे असे नमुने पाहायला मिळतात, जे पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. नेदरलँड्समध्येही असंच एक ठिकाण आहे, तिथला व्हिडिओ जेव्हाजेव्हा व्हायरल होतो, तेव्हा लोकांना त्याच्या खरं असण्याबाबत शंका येऊ लागते. हा व्हिडिओ तिथल्या एका पुलाचा आहे. नेदरलँड्सच्या वेलुवेमीर अ‍ॅक्वेडक्टच्या अनोख्या पुलाचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा पूल बांधून 20 वर्षे झाली तरी लोक याला बनावट फुटेज किंवा चमत्कार मानतात. या वेळी हा व्हिडिओ ट्विटरवर अॅल्विन फू नावाच्या युजरने शेअर केला असून, तो 9.5 मिलियन लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही कारण रस्त्यावरून चालणारी वाहनं अचानक पाण्यात गायब होत आहेत.

संबंधित बातम्या

खरं काय आणि भ्रम काय? व्हिडिओ पाहून तुम्हालाही पहिल्यांदा असंच वाटेल की रस्त्याच्या दुतर्फा येणारी वाहनं पाण्यात दिसेनाशी होतात आणि मग अचानक ती दुसऱ्या बाजूला दिसू लागतात. हा व्हिडिओ पाहून युजर्सच्या मनात गोंधळ निर्माण होत आहे की हे नक्की काय घडत आहे. 2002 मध्ये सुरू झालेला नेदरलँड्सच्या रिव्हर्स ब्रिजबद्दल ज्यांना माहिती आहे, त्यांना त्याचं सत्य माहीत आहे, परंतु ज्यांना माहीत नाही ते याला ग्राफिक्सचा चमत्कार मानतात. तुम्हीसुद्धा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहा.

इंजिनीअरिंगचा उत्तम नमुना 21 व्या शतकातील आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून हा अनोखा पूल ओळखला जातो. हा पूल नेदरलँड्समधील हार्डरविज इथं आहे. सहसा पूल पाण्यावरून जातात, परंतु इथं रस्ता पाण्याच्या आतून बनवला आहे आणि पाणी वरून वाहतंय. 25 मीटर लांब आणि 19 मीटर रुंद असलेला हा पूल लहान बोटी आणि इतर वाहनांसाठी खुला आहे. दररोज 28000 वाहनं या पुलावरून जातात आणि लोक हे सुंदर ठिकाण पाहण्यासाठी दुरवरून येतात. या पुलाचं विहंगम दृश्य एखाद्या ग्राफिक्ससारखं वाटतं. आपण पाहतोय ते खरं आहे, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. त्यामुळे हा पूल खरंच अस्तित्वात आहे की हा व्हिडिओ बनवला गेलाय, यावरून बऱ्याचदा लोकांची दोन मतं पाहायला मिळतात. या पुलाचे अनेक फोटो व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या