कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे काही लोकांना वर्क फ्रॉम करावं लागत आहे, तर काहींना ऑफिसमधून सुट्टी देण्यात आली आहे. यात घरात बसणारी मंडळी सतत फोन किंवा टिव्ही पाहून कंटाळली आहेत. अशाच लोकांसाठी सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक भन्नाट चॅलेंज आले आहेत. तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर, आम्हीही तुमच्यासाठी एक चॅलेंज घेऊन आलो आहोत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो आहे तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष गुरबंगुली बैरडेमुरमेदोन यांचा. असे म्हंटले जाते की, गुरबंगुली यांनी घोड्यांची प्रचंड आवड आहे. त्यामुळेच त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये गुरबंगुली आपल्या ऑफिसमध्ये काम करत आहेत, मात्र यातच एक चॅलेंज आहे.
या फोटोमध्ये हजारो घोडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही नेमके किती घोडे हे माजता आलेले नाही. जर तुमची नजर तीक्ष्ण असतील तर कदाचित तुम्हाला ओळखता येईल. त्यामुळं जर क्वारंटाईनमध्ये घरी बसून कंटाळा आला असेल तर, पाहा मोजून नेमके किती घोडे आहेत या फोटोमध्ये. शॉन वॉकर यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर त्यांनी लोकांना घोडे शोधण्याचे चॅलेंज दिले. मात्र वॉकर यांनी दिलेले उत्तर अविश्वसनीय आहेत.
वॉकर यांच्या मते या फोटोमध्ये 9 हजार 736 घोडे आहेत, कारण फोटोमध्ये असणारी पुस्तकी ही घोड्यांबाबतच आहेत.