Poetic Pilot Video
मुंबई, 14 जानेवारी: विमानप्रवासादरम्यान फ्लाइटमध्ये ज्या विविध अनाउन्समेंट्स होत असतात, त्या कानांना सुखावणाऱ्या असतात. काहींना तर या अनाउन्समेंट्स ऐकायला फार मजा वाटते. प्रत्येक विमान कंपनी या अनाउन्समेंट्सचे काही स्टँडर्ड्स सेट करत असते. त्याला अनुसरून करून पायलट किंवा केबिन क्रू विमानातल्या अनाउन्समेंट्स करतात; मात्र काही कर्मचारी असे असतात ज्यांना आपल्या पद्धतीनं या अनाउन्समेंट्स आणखी मजेदार करण्यासाठी करण्याची इच्छा असते. पायलट मोहित तेओतिया अशाच कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत. ते नेहमी कवितेच्या स्वरूपात अनाउन्समेंट करतात. त्यांची ही शैली प्रवाशांनादेखील आवडते. मोहित तेओतिया यांचे इन-फ्लाइट अनाउन्समेंट करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल झाले आहेत. आताही त्यांचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी दोन विशेष प्रवाशांचं फ्लाइटमध्ये स्वागत केलं आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मोहित तेओतिया हे स्पाइसजेट या कंपनीमध्ये पायलट आहेत. ते पोएटिक अर्थात कविमनाचे पायलट म्हणून ओळखले जातात. इन-फ्लाइट अनाउन्समेंट करताना मोहित कवितेप्रमाणे यमक जुळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अशा अनाउन्समेंट्सचे अनेक व्हिडिओ शेअर केलेले आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते हिंदीत बोलताना दिसतात. सुरुवातीला ते आपल्या सर्व प्रवाशांना नेहमीप्रमाणे विनोदी आणि काव्यात्मक शैलीत काही सूचना देतात. नंतर ही फ्लाइट त्यांच्यासाठी विशेष का आहे, याबद्दल सांगतात. मोहित इतर प्रवाशांशी शेअर करतात, की या फ्लाइटमध्ये त्यांची आई आणि एक वर्षाचा मुलगा पहिल्यांदाच त्यांच्यासोबत विमान प्रवास करत आहेत. हेही वाचा - जगातील बेस्ट फूड लिस्टमध्ये भारताच्या ‘या’ शहराचा समावेश; स्ट्रीट फूडला जागतिक स्थरावर मिळाली नवी ओळख हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आला आहे. शेअर केल्यापासून या व्हिडिओला 7.4 लाखांहून अधिक व्ह्युज आणि जवळपास 1.1 लाख लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर अनेक युझर्सनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
एका इन्स्टाग्राम युझरने लिहिलं आहे, “मला तुमची शैली फार आवडते.” आणखी एका युझरने कमेंट केली आहे, “कुटुंबासोबत प्रवास करत असल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.” सर्व प्रवासी आणि प्रेक्षक केवळ तुमच्या कवितेमुळेच नाही तर तुमच्या हसण्यामुळेही हसले आहेत. व्वा, फार आवडलं,’ अशा काही कमेंट्स इतर युझर्सनी केल्या आहेत.