व्हायरल व्हिडीओ
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : कोण कशापासून काय बनवेल आणि कसा जुगाड करेल याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर तर असे अनेक जुगाडू पहायला मिळतात. त्यांचे अनेक हटके जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एका जुगाडूचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या समोर आलेला जुगाडू व्हिडीओ एका आजोबांचा असून त्यांची हटके स्टाईलचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. मात्र त्याचा जुगाड पाहून अनेकजण त्यांना ट्रोल करत आहे. हा व्हिडिओ काही सेकंदांचा आहे. यामध्ये गुलाबी फेटा आणि तपकिरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला वृद्ध दिसत आहे. त्याने दोन काळ्या रंगाच्या बकऱ्यांवर दुचाकी जुगाडू गाडी केली असून त्यावर तो स्वार झालेला दिसत आहे. हा व्हिडिओ तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेराने बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हा देसी जुगाड पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून युजर्सनी या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. म्हातारपणात म्हाताऱ्याचे मन हरपल्याचेही काहींनी लिहिले. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, बिचारी बकरी मरेल काका. त्याचवेळी दुसर्या युजरने लिहिले की, लोक काहीही करतात. @lsawarmal या यूजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर शेअर केला होता. याला आतापर्यंत 37 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 1 लाख 38 हजार लाईक्स मिळाले आहेत.
दरम्यान, आत्तापर्यंत तुम्ही लोकांना टांगा, घोडा, बैलगाडी, मोटारसायकल किंवा कारचे जुगाड करताना पाहिले असेल. यांचेही हटके जुगाडू व्हिडीओ समोर आले आहेत. असे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अनेकाचं कौतुक केलं जातं आणि बरेजण ट्रोलदेखील होतात.