ऑप्टिकल इल्युजन
मुंबई, 04 नोव्हेंबर: सोशल मीडियावर अनेक मनोरजंक गोष्टी आपल्याला सापडतात. सध्या ऑप्टिकल इल्युजनचे खेळ चांगलेच चर्चेत आहेत. दृष्टिभ्रमाच्या या खेळात लपलेल्या गोष्टी शोधून काढणं अशक्यच असतं. जेव्हा खूप प्रयत्न करून आणि बुद्धीचा वापर करूनही एखादी गोष्ट साध्य होत नाही; त्यावेळेस समजावं, की हे साधसुधं काम नाही. हा तुमच्या नजरेला आणि बुद्धीला आव्हान देणारा दृष्टिभ्रमाचाच हा खेळ आहे हे नक्की. ऑप्टिकल इल्यूजनमुळे केवळ तुमच्या नजरेची पारख होत नाही, तर तुमच्या बुद्धीचा कस आणि संयमाची परीक्षाच ठरते. तसंच तुमची मानसिकता कशाप्रकारची आहे याचीही पडताळणी होते. ब्राईट साईडतर्फे एक फोटो सध्या व्हायरल झालाय. हा फोटो ऑप्टिकल इल्युजनचा आहे. या फोटोत एक कॅमेरामन झाडीत कुठेतरी उभा आहे. अर्थात, तो सहजासहजी दृष्टीस पडत नाही. अशाप्रकारेच त्या फोटोची रचना आहे. कमी वेळात त्याला शोधून काढताना अनेकांना घाम फुटलाय; पण तुम्ही खरंच या लपलेल्या कॅमेरामनला शोधून काढाल? हेही वाचा - Kuhlad Chai Benefits : फक्त टेस्टीच नाही तर हेल्दीही असतो कुल्हड चहा; पाहा काय आहेत फायदे गर्द झाडी असलेल्या फोटोतून शोधा कॅमेरामन या फोटोत निसर्ग दिसतोय. या फोटोत आकाश, ढग, डोंगर आणि वाहणारी नदी दिसतेय. तसंच डोंगरावर आणि आजूबाजूला हिरवी झाडंही आहेत. नदीच्या दोन्ही काठांवर जुन्या पडक्या किल्ल्यासदृश आकृती दिसतेय. अशा या नयनरम्य फोटोतून लोकांना दडलेला कॅमेरामन शोधण्याचं आव्हान दिलं गेलंय. हा कॅमेरामन हा या फोटोतच आहे. असं सांगितलं जातंय की कॅमेरामन या रम्य ठिकाणाचे फोटो घेण्यासाठी आला आहे. परंतु, आता तो कुठेतरी लपून बसलाय. या कॅमेरामनला शोधण्यासाठी तुमच्याकडे अगदी काही सेकंदच आहेत. जे कुणी कॅमेरामनला शोधू शकतील, ते स्वत:च्या तीक्ष्ण नजरेची आणि तल्लख बुद्धिची साक्षच देतील.
किल्ल्यावर उभं राहून फोटोग्राफी करताना दिसला लपलेला कॅमेरामन हा फोटो पाहिल्यावर तुम्ही नक्कीच गोंधळात पडाल, ज्यामुळे त्या कॅमेरामनला शोधणं केवळ अशक्य आहे. किल्ल्याचा डोलारा, आकार हा अगदी फसवा वाटावा असाच आहे. पण आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. तुम्ही ज्या कॅमेरामनच्या शोधात आहात, तो एका उंच किल्ल्यावर आपला कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करताना दिसतोय. हा कॅमेरामन हे विलोभनीय दृश्य कॅमेर्यात कैद करण्यात दंग आहे. कॅमेरामनला टिपायचे असल्यास फोटोच्या डाव्या बाजूला पाहा. परंतु, तरीही तुम्हाला कॅमेरामन सापडत नसेल तर तुम्ही वर दिलेल्या फोटोतील कॅमेरामनला तुम्ही पाहू शकाल. तो जिथे उभा आहे, त्या जागेभोवती लाल रंगाचे वर्तुळ करण्यात आले आहे.