नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : वेळ वाचवण्याच्या (Time Management) नादात माणसं काहीही करू शकतात आणि मग विचित्र परिस्थिती (Unwarranted Circumstance) ओढवते. म्हणून सार्वजनिक ठिकाणी असताना काही गोष्टीचं भान हे ठेवायलाच हवं. (Public Place Mannerism). जर हे भान नसेल तर एकाच्या निष्काळजीपणाची शिक्षा समोरच्या व्यक्तीला भोगावी लागू शकते. असंच काहीसं एका महिलेच्या बाबतीत घडलं. एस्कलेटरवरून उतरताना दुसर्या सहप्रवाशाचा मूर्खपणा तिला चांगलाच भोवला. @TansuYegen या ट्विटर अकांउंटवरून चित्र-विचित्र व्हिडिओ शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ ज्यात आपल्याला दिसतं की एका एस्कलेटर वरून दोन महिला उतरणार आहेत आणि त्या दोघींसोबत खूप सामान (Excess Luggage Limitation) आहे. तेव्हा त्यातली एक महिला आपली सूटकेस उचलून एस्कलेटरवर ठेवते जेणेकरून ती विनासायास खाली जाऊ शकेल. पण त्याच वेळेस बॅगेचा तोल जातो आणि वेगाने ती बॅग एस्केलेटरवरून खाली घसरत जाते. याचवेळेस एस्केलेटरच्या सर्वांत खालच्या पायरीवर असलेल्या महिलेला लक्षात येतं की वरून घरंगळत बॅग जोरात खाली येते आहे. ती अपघात घडू नये म्हणून पुढे उडी घेते पण तेवढ्यात वरून येणारी सूटकेस तिच्या पायांखालीच येते. ती महिला दुखापतग्रस्त(Casualties) होते. नंतर तिला स्ट्रेचर वरून घेऊन जाताना आपल्याला या व्हिडिओत दिसतं. ते आले आणि जीव मुठीत धरून पळाले; 20 सेकंदात चोरांसोबत असं काही घडलं की… ; पाहा VIDEO हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आणि लोकांच्या रिऍक्शनस (Public Reactions on Social Media) ही आल्याच. या व्हिडिओला जवळजवळ एक लाख व्ह्युज मिळाले आहेत. त्यातल्याच एका युजरने प्रतिक्रिया दिली, “एस्कलेटरच्या (Escalator Accidents) वरच्या बाजूस उभी असलेली महिला इतकी मूर्ख कशी? तिने एस्कलेटर पेक्षा लिफ्टचा उपयोग केला असता तर दुसर्या महिलेचा अपघात टळला असता.” दुसर्या एका व्यक्तीने म्हटलंय, “अशी परिस्थिती जर कोणावर ओढवलीच तर आपल्यावर आदळणारी गोष्ट दिसत असताना त्याकडे दुर्लक्ष न करता(Presence of Mind) त्या गोष्टीच्या मार्गातून दूर होणंच शहाणपणाच ठरतं. ह्याच पद्धतीने ती महिला जागरूक (Alertness) राहिली असती तर हा अप्रिय प्रसंग तिच्यावर ओढवला नसता.”
हा व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याकडून ही अशी घटना घडणार नाही याची एक सुजाण नागरिक म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. त्याचबरोबर तुम्ही जर एस्केलेटर वापरत असला तर सावध राहणं ही पण तुमची जबाबदारी आहे हेही तुमच्या लक्षात आलं असेलच.