JOIN US
मराठी बातम्या / Viral / 2022 च्या शेवटी भारतीयांच खरं प्रेम सापडलं, स्विगीवरून सर्वांत जास्त ऑर्डर केला हा पदार्थ

2022 च्या शेवटी भारतीयांच खरं प्रेम सापडलं, स्विगीवरून सर्वांत जास्त ऑर्डर केला हा पदार्थ

स्विगीनं याबाबत निरीक्षण नोंदवलं आहे.

जाहिरात

संपादित छायाचित्र

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : सध्या ऑनलाइन फूडची मोठी चलती आहे. घरबसल्या ऑनलाइन फूड मागवण्याकडे खवय्येगिरी करणाऱ्यांचा मोठा कल आहे. ऑनलाइन फूडच्या क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या स्विगी या कंपनीनं यंदाच्या वर्षी ऑर्डर केलेल्या फूडबाबत इंटरेस्टिंग निरीक्षणं नोंदवली आहेत. सन 2022 मध्ये स्विगी अ‍ॅपवरून सर्वाधिक ऑर्डर केलेल्या डिशमध्ये चिकन बिर्याणी या डिशनं अव्वल स्थान पटकावलं आहे. ‘दैनिक भास्कर’नं त्याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

स्विगीच्या या निरीक्षणांचा अर्थ असा, की 2022मध्ये चिकन बिर्याणी सर्वांत जास्त ऑर्डर करण्यात आली आहे. या सर्व निरीक्षणांमध्ये आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या सात वर्षांपासून बिर्याणी ही देशात सर्वाधिक ऑर्डर करण्यात आलेली डिश आहे. स्विगी कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार बेंगळुरूतील एका व्यक्तीनं स्विगी इन्सामार्टमधून वर्षभरात तब्बल 16 लाख रुपयांचं किराणा सामान ऑर्डर केलं गेलंय. कंपनीच्या माहितीनुसार खाण्यावर प्रेम करणारे दिवसेंदिवस वाढतच आहे आणि ऑनलाइन फूड ऑर्डर करणारेही वाढत आहेत.

चिकन बिर्याणीसोबतच तंदुरी आणि मोगलाई डिशही यंदाच्या वर्षात भारतीयांनी ऑर्डर केल्या. तसंच भारतीयांनी यंदा खाण्याबाबत बरेच प्रयोग केल्याचं स्विगीनं म्हटलंय. यंदा अनेक युजर्सनं भारतीय खाद्यपदार्थांबरोबरच कोरियाई आणि इटालियन पदार्थांचीही ऑर्डर दिली. त्यात पास्ता, पिझ्झा, मेक्सिकन बाउल, मसालेदार रेमन सुशी, रॅविओली (इटालियन) आणि बिबिंबॅप (कोरियन) या पदार्थांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

आठ वर्षीय मुलीचं सांताक्लॉजला पत्र, चिमुकलीने आई-वडिलांसाठी मागितलं ‘हे’ गिफ्ट

जेवणाच्या बरोबरीनं स्नॅक्स आणि डेझर्टही खूप ऑर्डर केलं जातं. स्नॅक्समध्ये सामोशानं वरचा क्रमांक पटकावलाय. त्यानंतर पॉपकॉर्न, पावभाजी, फ्रेंच फ्राईज, गार्लिक ब्रेडला लोकांनी पसंती दिलीय. डेझर्टमध्ये गुलाबजाम ही लोकांची फेव्हरिट डिश आहे. त्याशिवाय रसमलई आणि चॉकलेटही लोकांनी आवडीनं ऑर्डर केलंय.

जाहिरात

जेवणासाठी प्रेमापेक्षा महत्त्वाचं दुसरं काही नसतं, असं स्विगीचं म्हणणं आहे. तसं निरीक्षण त्यांनी काही ऑर्डर्सच्या लीस्टवरून नोंदवलंय. बेंगळुरूतल्या एका व्यक्तीनं दिवाळीत 75378 रुपयाचं अन्न ऑर्डर केलं, तर पुण्यातल्या एका व्यक्तीनं आपल्या टीमसाठी 71229 रुपयांचे बर्गर आणि फ्रेंच फ्राइज ऑर्डर केले.

आवडीचे खाद्यपदार्थ कमीतकमी वेळात घरपोच आणून देण्यासाठी स्विगीसारख्या ऑनलाईन कंपन्या काम करतात. त्याबाबतही स्विगीनं निरीक्षण नोंदवलं आहे. आतापर्यंत इन्स्टामार्टकडून सर्वात वेगानं म्हणजे 1.03 मिनिटांत ऑर्डर पोचवली गेली. हे दुकान ग्राहकापासून 50 मीटरच्या अंतरावर होतं. लोकांनी आतापर्यंत स्विगी इन्स्टामार्टवरून इन्स्टंट नूडल्स आणि दुधाची भरपूर ऑर्डर दिली आहे. त्याशिवाय 3,62,10,084 चिप्सच्या ऑर्डरही इन्स्टामार्टवर दिल्या गेल्यात.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या