मुंबई 16 जानेवारी: चोरीच्या अनेक घटना तुम्हा पाहिला असतील. मग ती चोरी घरामध्ये झाली असो किंवा दुकांनात. मात्र चोरीचा डावच फसल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का? अशीच एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एका दुकानातल्या वस्तुंवर दिवसाढवळ्या हात साफ करायला आलेल्या चोरालाच दुकानदारानं चांगली अद्दल घडवली. दुकानदारानं चोराला दिलेल्या या शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान viral होत आहे. त्या वेळी दुकानात नेमकं काय घडलं? एका दुकानात अचानक दुकानात घुसला. त्याच्या हातात बंदुक होती. त्याने बंदुकीचा धाक दाखवून दुकानदाराला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानदारानं न घाबरता हिम्मत दाखवली. दुकानदाराचा राग पाहून चोराची पळता भुई थोडी झाली आणि त्यानं दुकानातून पळ काढला. दुकानदारानंही त्याची पाठ सोडली नाही. काठी घेऊन त्याने चोराचा पाठलाग केला. ही सर्व घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. आता ती घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारे रिएक्ट करत आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करताना असे लिहिले आहे की, ‘‘माझा भाऊ जगातला सर्वात शांत व्यक्ती आहे, परंतू या घटनेमध्य़े त्याला रागवलेलं पाहिलं आहे. एकदा नक्की ऐका.’’ अशा कॅप्शनने सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की चोराच्या हातात बंदुक आहे आणि बंदुकीचा धाक दाखवून दुकानदाराकडे पैसे मागत आहे. त्यावेळी दुकानदार आपल्या पैशांचा गल्ला उघडतो आणि विचारतो ‘‘आणखी काय पाहिजे आहे का, त्यावर उत्तर देत चोर म्हणतो की, नाही फक्त पैसे दे’’. हे ऐकून दुकानदाराच्या रागाचा पारा चढतो आणि तो हातात काठी घेतो. चोर हा सगळा प्रकार पाहून दुकानातून पळ काढतो. चिडलेला दुकानदार हातात काठी घेऊन चोराचा पाठलाग करतो. या व्हिडिओला ट्विटरवर आता पर्यत 2 लाख लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर 13 हजारपेक्षा जास्त लाइक्स आणि 4 हजारपेक्षा जास्तवेळा हा video रि- ट्वीट करण्यात आला आहे.