या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
हे कोणी सर्वसामान्य कुटुंब नाही. त्यांच्या जीवनात ज्या तीन महिला आहेत, त्यापैकी एक पहिली पत्नी आहे, दुसरी त्याची पत्नी आणि तिसरी त्याच्या पहिल्या पत्नीची गर्लफ्रेंड आहे. हे चारजणं मिळून एक कुटुंब झालं आहे आणि सर्वजण एकत्र राहतात. जोश रप्पाहन याने आपल्या पत्नीसह मिळून कुटुंब वाढवलं आहे. तर त्याची पहिली पत्नी आपल्या गर्लफ्रेंडसह कुटुंब वाढविण्याच्या तयारीत आहे. यासाठी तिला पहिल्या पतीने मदत केली आहे.
जोश रप्पाहन याचं लग्न जेनिफर वाजक्वेस हिच्यासोबत झालं होतं. मात्र जेनिफर समलैंगिक असल्याचं समोर आलं. यानंतर तिने पतीला घटस्फोट दिला आणि आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं. जेव्हा लेस्बियन दाम्पत्याला कुटुंब वाढविण्याची वेळ आली तेव्हा तिने पहिला पती जोश याच्याकडे मदत मागितली.
जोश आणि जेनिफरला एक 11 वर्षांचा मुलगादेखील आहे. जेव्हा लेस्बियन पत्नीसोबत त्याचा घटस्फोट झाला त्यानंतर जोशने 31 वर्षीय डेनियलसोबत लग्न केलं. या लग्नानंतर दोघांना 5 वर्षांची मुलगी आहे.
दुसरीकडे जोशची पहिल्या पत्नीने आपल्या 30 वर्षीय गर्लफ्रेंड चॅनटेलसोबत लग्न केलं. जेव्हा या दाम्पत्याला कुटुंब वाढविण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी जोशशी संवाद साधला. त्यांनी जोशला त्याचे स्पर्श देण्याची विनंती केली. यानंतर त्याची पहिली पत्नी आई झाली. या वर्षी त्यांनी बाळाला जन्म दिला आहे.
हे अनोखे नातेसंबंध आणि अजब असं कुटुंब टीव्ही शो 'You Me and My Ex' च्या माध्यमातून लोकांच्या समोर आला. या मालिकेच्या एका भागात कुटुंबातील सर्व सदस्य आले होते. यावेळी त्यांनी आपला अनुभव शेअर केला. जोश आपल्या आयुष्यातील तिनही महिलांसोबत बसले होते. विशेष म्हणजे हे सर्वजण एका छताखाली राहत आहेत.
जोशच्या पहिल्या पत्नीचं म्हणणं आहे की, नक्कीच त्या एकमेकींच्या बहिणी नाहीत. मात्र तरीही त्यांचं नातं आहे. तर जोश म्हणाला की, घटस्फोटानंतर एकमेकांबद्दल राग ठेवण्याची गरज नसते. विशेष करून जेव्हा यामध्ये मुलांचा सहभाग असेल.