स्वप्न पाहता पाहता त्याने प्रत्यक्षात कापला स्वतःचा 'तो' अवयव (प्रतीकात्मक फोटो)
घाना, 20 ऑगस्ट : प्रत्येकाला झोपेत स्वप्न ही पडतातच. काही लोक स्वप्नात जे दिसतं त्यावर प्रत्यक्षातही कृती करत असतात, ज्याची माहिती त्यांनाही नसते. असे काही लोक तुम्हाला माहिती असतील जे झोपेत हसतात, रडतात, बडबडतात, काही तरी कृती करत असल्यासारखी हातापायांची हालचाल करतात. खरंतर हे सर्व ते स्वप्नात करता करता प्रत्यक्षात करू लागतात. असं एका व्यक्तीसोबत घडलं. पण जे स्वप्न त्याने नकळतपणे प्रत्यक्षात केलं त्यामुळे त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे. घानातील 47 वर्षांचा कोफी अट्टा. त्यावेळी त्याला बसल्या बसल्या अचानक झोप लागली. झोपेत त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात खुर्चीवर बसून तो मांसाचा तुकडा कापत होता. मांस कापताना त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तो हडबडून जागा झाला आणि पटकन स्वप्नातून बाहेर आला. प्रत्यक्षात पाहतो तर काय त्याच्या हातात खरंच चाकू होता आणि स्वप्नात जे मांस तो कापत होता ते मांस नव्हतं तर त्याच्याच शरीराचा एक अवयव होता जे पाहून तो हादरलाच. हे वाचा - क्रूर प्रथा! इथं कुटुंबात कुणाचाही मृत्यू झाला तर कापलं जातं जिवंत महिलेचं ‘हे’ अंग स्वप्नात मांस समजून प्रत्यक्षात त्याने आपला प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. त्यानंतर तो ओरडू, किंचाळू लागला. त्याने मदतीसाठी आपल्या शेजाऱ्यांना बोलावलं. त्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. आपली झोप रुगणालयात उडाल्याचं त्याने सांगितलं. कारण खूप रक्तास्राव झाल्याने तो बेशुद्धावस्थेत होता. रिपोर्ट नुसार BBC Pidgin शी बोलताना कोफीने सांगितलं, या घटनेमुळे कोफीसुद्धा हैराण झाला आहे. कारण त्याच्या हातात चाकू कसा आला हे त्यालाच माहिती नाही. हे वाचा - बायसेप्सच्या हट्टामुळे हात कापण्याची वेळ, मृत्यूचा दाढेतून परतला; तरुणानं सांगितली कहाणी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. त्याच्या जखमांवर उपचार केले जात आहेत. पण त्याला पूर्णपणे ठिक होण्यासाठी बऱ्याच सर्जरी कराव्या लागतील. आता सर्जरीसाठी तो फंड जमवत आहे.