भोपाळ, 10 जून : दोन मित्र अंघोळीसाठी नदीत उतरले असताना अचानक एकावर मगरीनं हल्ला केला आणि तरुण जखमी झाला. मित्रानं या तरुणाची मगरीचा तावडीतून सुटका केली आहे. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळ इथले रहिवासी असलेले अमित आणि गजेंद्र अंघोळीसाठी नदीत उतरले होते. अंघोळ करताना अचानक अमितवर मगरीनं हल्ला केला. अमितने जीव वाचवण्यासाठी ओरडायला सुरुवात केली. मित्र गजेंद्रनं आपला जीव धोक्यात घालून अमितचा जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. मगरीच्या हल्ल्यात अमित जखमी झाला असून सध्या त्याच्यावर शारदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मगरीनं पायावर हल्ला केल्यानं जखमी अमित जखमी झाला आहे. हे दोन्ही तरुण नेहरुनगर पोलीस ठाणा परिसरातील रहिवासी आहेत. नदीमध्ये मगर असल्यानं आता ग्रामस्थांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे. हा मगरीनं हल्ला केल्यानंतर मित्रानं अमितचा जीव वाचवल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 1 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. संपादन- क्रांती कानेटकर