JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! लग्न लागत असतानाच वर-वधूवर कोसळली वीज, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

बापरे! लग्न लागत असतानाच वर-वधूवर कोसळली वीज, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

लग्न लागत असतानाच अचानक वर-वधूवर कोसळलेल्या विजेनं सर्वांनाच हादरून सोडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बॉस्टन, 28 ऑगस्ट : लग्न म्हटलं की वऱ्हाडी, वरात या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. मात्र लग्न कधीच वीज कोसळ्याचे पाहिले किंवा ऐकले आहे? नाही ना. मात्र असा प्रकार एका लग्नात घडला. सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र लग्न लागत असतानाच अचानक वर-वधूवर कोसळलेल्या विजेनं सर्वांनाच हादरून सोडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वर-वधूनं 2020 या वर्षालाच कारणीभूत ठरवलं आहे. त्यांच्या मते कोणाला इजा झाली यातच त्यांचे समाधान आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बोस्टनचा आहे. अॅरॉन शॉविस्की आणि डेनिस मॅक्लर यांचे लग्न लागत असताना हा प्रकार घडला. मुख्य म्हणजे सकाळी कडक उन्ह पडले होते, मात्र काही वेळानंतर अचानक पावसाचे वातावरण झाले. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काहींना वधू-वरांचा आशीर्वाद देण्यासाठी थेट ही वीज कोसळली असल्याचे म्हटले आहे.

अॅरॉन शॉविस्कीनं स्वत: हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत, वीज कोसळल्यामुळे सर्व पाहुणे मंडळीही घाबरले होते, मात्र यात कोणालाही इजा झाली नाही, असे कॅप्शन दिले. तर, या दोघांच्या आणखी एका फोटोमध्ये मागे इंद्रधनुष्यही दिसत आहे. यावर युझरनं निसर्गाचं वरदान असलेलं वर-वधू असे त्यांना म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या