JOIN US
मराठी बातम्या / Viral / जगातील बेस्ट फूड लिस्टमध्ये भारताच्या 'या' शहराचा समावेश; स्ट्रीट फूडला जागतिक स्थरावर मिळाली नवी ओळख

जगातील बेस्ट फूड लिस्टमध्ये भारताच्या 'या' शहराचा समावेश; स्ट्रीट फूडला जागतिक स्थरावर मिळाली नवी ओळख

खाण्या-पिण्याच्या पदार्थांचा विचार केला तर भारत अतिशय समृद्ध देश मानला जातो. जगाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना भारतातील खाद्यपदार्थांची भुरळ पडलेली आहे. यामध्ये अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून ते सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. संपूर्ण भारताचा विचार केला तर कोलकात्यातील स्ट्रीट फूड सर्वोत्तम मानलं जातं.

जाहिरात

संग्रहित फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जानेवारी- खाण्या-पिण्याच्या पदार्थांचा विचार केला तर भारत अतिशय समृद्ध देश मानला जातो. जगाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना भारतातील खाद्यपदार्थां ची भुरळ पडलेली आहे. यामध्ये अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून ते सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. संपूर्ण भारताचा विचार केला तर कोलकात्यातील स्ट्रीट फूड सर्वोत्तम मानलं जातं. असं म्हणतात की, जर तुम्ही खाण्यासाठी नवनवीन पदार्थ शोधत असाल तर तुम्हाला कोलकात्यापेक्षा चांगलं ठिकाण मिळणार नाही. कोलकात्यामध्ये जगभरातील खाद्यसंस्कृती एकत्र पाहायला मिळते आणि प्रत्येक पदार्थाला स्वतःचा इतिहास आहे. या शहराचा जगातील सर्वोत्तम फूड डेस्टिनेशनच्या यादीत समावेश झाला आहे. कोलकाता हे एकमेव भारतीय शहर आहे ज्याला फूड वेबसाइट ईटरनं जगातील सर्वोत्तम फूड डेस्टिनेशनच्या यादीत समाविष्ट केलं आहे. ‘एनडीटीव्ही’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ईटर वेबसाइटनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलद्वारे याची घोषणा केली आहे. ईटरच्या म्हणण्यानुसार, “2023मध्ये डायनिंग डेस्टिनेशन्स निवडताना त्यांनी फक्त हिट लिस्ट किंवा मस्ट ट्राय डिश हे दोन घटकच नाहीत तर खाणाऱ्यांना पदार्थांबद्दल सर्वसमावेशक अनुभव यावा याचीही काळजी घेतली आहे. हे पदार्थ खाताना लोकांना निसर्ग, संस्कृती आणि त्या पदार्थामागचा इतिहास कसा समजेल, याचाही विचार ही डायनिंग डेस्टिनेशन्स निवडताना केला गेला आहे.” **(हे वाचा:** रस्त्यावरचा वडापाव की दुकानातील बर्गर; आरोग्यासाठी काय खाणं आहे फायदेशीर? ) कोलकाता हे जगातील सर्वोत्तम फूड डेस्टिनेशन्सपैकी एक आहे, हे सिद्ध झालं आहे. जर तुम्ही कधी या शहराला भेट दिली तर कोणत्या पदार्थांचा आस्वाद घेतला पाहिजे, याबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. 1. पुचका (Phuchka): काही स्ट्रीट फूड खाल्ल्याशिवाय कोणतीही खाद्यभ्रमंती पूर्ण होत नाही. कोलकात्यातील खाद्यभ्रमंती सुरू करण्यासाठी पुचक्यांपेक्षा चांगला पर्याय मिळणार नाही. बंगाली पुचका म्हणजे आपल्याकडील पाणीपुरी. ही पुरी भरण्यासाठी, बटाट्यामध्ये अनेक मसाले, मोड आलेली कडधान्यं आणि चिंचेच्या पाण्याचा वापर करतात. त्यामुळे पुचक्याला एक मसालेदार आणि आंबट-तिखट चव येते. 2. काटी रोल्स (Kati Rolls): आजकाल जवळपास प्रत्येक शहरात एक रोल शॉप आपल्याला बघायला मिळतं. पण, या रोल्सची मुळं कोलकात्याशी जोडलेली आहेत. रोलचा (विशेषत: काटी रोल) शोध 20 व्या शतकापूर्वी लागला होता. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, 1932 मध्ये सर्वप्रथम ‘निजाम’ नावाच्या एकमेव रेस्टॉरंटमध्ये हा रोल बनवला गेला होता. काटी रोल हे ग्रिल केलेल्या चिकन कबाबपासून बनवले जातात.

संबंधित बातम्या

3. तेले भाजा (Tele Bhaja): तेले भाजाशिवाय बंगालमधील संध्याकाळ अपूर्ण वाटते. हा पदार्थ म्हणजे बटाटे, कांदे, वांगी, मासे, चिकन, मटण इत्यादीपासून बनवलेला बंगाली शैलीचा पकोडा आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात किमान एक तेले भाजा कॉर्नर नक्कीच सापडेल. 4. देसी चायनीज (Desi Chinese): कोलकाता हे शहर इंडो-चायनीज खाद्यपदार्थांचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं. भारतीय चायनीज खाद्यपदार्थांचा इतिहास 1700 च्या उत्तरार्धात कोलकात्यामध्ये स्थायिक झालेल्या ‘हक्का’ चिनी व्यापाऱ्यांशी संबंधित आहे. तेव्हा कोलकाता (कलकत्ता) ही भारतातील ब्रिटिश साम्राज्याची राजधानी होती. 5. कोलकाता बिर्याणी (Kolkata Biryani): बटाटे आणि अंड्यांशिवाय कोलकात्यातील बिर्याणी अपूर्ण मानली जाते. कोलकाता बिर्याणीमध्ये अंडी आणि बटाटे असलेच पाहिजेत कारण यामुळेच ती अद्वितीय बनते. अवधचा राजा नवाब वाजिद अली शाह याला 1856 मध्ये ब्रिटिशांनी लखनऊ येथून हटवून कोलकात्यात पाठवलं होतं तेव्हा त्यानं कोलकाता बिर्याणीचा शोध लावला. कोलकात्यातील बिर्याणी कमी मसालेदार असते. ती सालान (बिर्याणीची करी) किंवा कोशिंबिरीशिवाय खाल्ली जाते.

ईटर वेबसाइटच्या सर्वोत्तम फूड डेस्टिनेशन्सच्या यादीमध्ये कोलकात्याव्यक्तीरिक्त इतरही शहरांचा समावेश आहे. ज्यात अॅशेव्हिल (उत्तर कॅरोलिना), अल्बुकर्क (न्यू मेक्सिको), ग्वाटेमाला सिटी (ग्वाटेमाला), केंब्रिज (इंग्लंड), डकार (सेनेगल), हॉलंड (स्वीडन), सार्डिनिया (इटली), मनिला (फिलिपिन्स) आणि हो ची मिन्ह सिटी (व्हिएतनाम) यांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या