JOIN US
मराठी बातम्या / Viral / कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं कमी केलं तब्बल 112 किलो वजन, सांगितलं आपलं सीक्रेट

कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं कमी केलं तब्बल 112 किलो वजन, सांगितलं आपलं सीक्रेट

वाढलेलं वजन ही आजच्या काळातील सर्वात महत्त्वाची आरोग्य समस्या आहे. अनेक जण लठ्ठपणामुळे चिंतेत आहेत. असाच कोल्हापुरातला एक जण वाढत्या वजनामुळे चिंतेत होता. पण त्याने वजन इतकं कमी केलंय की त्याला ओळखणंही कठीण झालंय.

जाहिरात

जुनैद जमादार

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 ऑक्टोबर-   वाढलेलं वजन ही आजच्या काळातील सर्वात महत्त्वाची आरोग्य समस्या आहे. अनेक जण लठ्ठपणामुळे चिंतेत आहेत. असाच कोल्हापुरातला एक जण वाढत्या वजनामुळे चिंतेत होता. पण त्याने वजन इतकं कमी केलंय की त्याला ओळखणंही कठीण झालंय. जुनैद जमादार असं या तरुणाचं नाव आहे. त्याने वजन कमी करून त्याला चिडवणाऱ्या सर्वांचं तोंड बंद केलंय. जुनैदचं वजन तब्बल 207 किलो होतं. पण आता त्याचं वजन 95 किलो झालंय. त्याने आतापर्यंत तब्बल 112 किलो वजन कमी केलंय. त्याची ही वजन कमी करण्याची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. जुनैद सांगतो की, जेव्हा त्याचं वजन वाढलं होतं, तेव्हा तो घराबाहेर पडायला देखील घाबरत होता. आजारी असतानाही रुग्णालयात जायलाही त्याला भीती वाटत होती. एकदा डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं ‘की त्याला इंजेक्शन दिले तरीही ते औषध त्याच्या शरीरातील योग्य ठिकाणी पोहोचणार नाही, कारण मांसाचा थर खूप जाड होता. एवढंच नाही तर माझं वाढलेलं वजन पाहून लोक माझी खिल्ली उडवायचे.’ असंही जुनैदनं सांगितलं. पण जुनैदने लोकांच्या टोमण्यांचा आणि भीतीचा सामना केला आणि 112 किलो वजन कमी करून सर्वांना थक्क केलं.टेलरही जुनैदचे कपडे शिवण्यास नकार द्यायचे. ‘माझ्या शर्टचा साईझ 8XL आणि पँटचा साईझ 64 cm होता. रेडिमेड कपडे मिळायचे नाहीत, त्यामुळे मला टेलरकडे जावं लागायचं. टेलरला माझ्या कपड्यांसाठी साईझ मोजणं खूप कठीण जायचं, त्यामुळे त्याला माझे कपडे शिवणं आवडत नव्हतं,’ असं जुनैदने सांगितलं. जुनैद डिप्रेशनचा ठरला बळी जुनैद म्हणाला, ‘मला पाहून लोक विचित्र वागायचे. ते मला माणसासारखं नव्हे तर प्राण्यासारखं वागवायचं. लोकांच्या कमेंट्स व टोमणे ऐकून मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि सिगारेट-दारू पिऊ लागलो. माझी अवस्था पाहून पप्पा म्हणाले की तू काही काम करू नकोस, फक्त तुझं वजन कमी कर. हे सांगताना ते रडत होते, त्यांना माझा त्रास बघवत नव्हता. त्यानंतर मी वजन कमी करायचं ठरवलं.’ **(हे वाचा:** Diwali 2022 : मिठाई कितीही खाल्ली तरी काही फरक पडणार नाही; फक्त खाण्याची पद्धत बदला ) लॉकडाउनमध्ये सुरू झाली वजन कमी करण्यास सुरुवात यानंतर जुनैद जिममध्ये जाऊ लागला. एक ते दोन आठवड्यांत त्याने 8 किलो वजन कमी केलं. त्यानंतर मला अजून जास्त वजन कमी करण्याची प्रेरणा मिळाली. ‘पहिला एक आठवडा मी डाएटमध्ये कोणताही बदल केला नाही. मला फक्त शरीराला वर्कआउटची सवय लावायची होती. आधी 20 मिनिटं वर्कआउट करायचो, नंतर हळूहळू ते वाढवलं,’ असं तो सांगतो.

संबंधित बातम्या

डाएट आणि रुटिनमध्ये केला बदल ‘त्यानंतर मी डाएटिशियनशी संपर्क साधला. आधी मी 12 वाजता उठायचो आणि संध्याकाळी 4 वाजता जेवायचो. मात्र एक्सपर्ट्सनी हे रुटिन बदलण्यास सांगितलं. यानंतर मी सकाळी 6 वाजता उठू लागलो आणि 8 वाजता नाश्ता करू लागलो. त्यानंतर 11 वाजता जेवण करायचो. एका महिन्यात जिम आणि डाएटमुळे माझे 15 किलो वजन कमी झालं,’ असं जुनैदने सांगितलं. वजन कमी करताना जुनैदचं रुटिन काय होतं? सकाळी 6 वाजता उठायचं, नंतर कोमट पाण्यात लिंबू पाणी प्यायचं. नंतर अॅलोव्हेरा ज्यूस प्यायचा आणि वर्कआउट करायचं. तब्बल अडीच तासमसल्स वर्कआउट, वॉर्मअप, कार्डियो एक्सरसाइझ करायचे. एवढं झाल्यानंतर घरी यायचं आणि 9 वाजता नाश्ता करायचा. नाश्त्यात मसाला ओट्स आणि अंडी खायची. त्यानंतर दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान नारळपाणी प्यायचं. दुपारच्या जेवणात सॅलेड, दही, ताक, 1 किंवा 2पोळ्या आणि स्प्राउट खायचे. त्यानंतर दुपारी पुन्हा जिमला जायचं. जिमला जाण्याआधी ब्रेडसोबत पीनट बटर खायचं. त्यानंतर संध्याकाळी कार्डियो वर्कआउट करायचं आणि नंतर रात्रीच्या जेवणात चिकन आणि सॅलेड खायचं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या