JOIN US
मराठी बातम्या / Viral / जगातील सर्वात धोकादायक जमात माहिती आहे का ? जेथे लोक प्राण्यांचे रक्तही पितात

जगातील सर्वात धोकादायक जमात माहिती आहे का ? जेथे लोक प्राण्यांचे रक्तही पितात

पूर्व आफ्रिकेत राहणारी ही जमात ( Mursi tribe )जगातील सर्वात धोकादायक जमात मानली जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 जानेवारी: ज्या-ज्या भागापर्यंत विकासाची गंगा ( development ) पोहोचते, तो भाग प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. तेथील लोकांचे राहणीमान सुधारते. ते स्वतः वर्षांनवर्षे पाळत असलेल्या अमानवीय परंपरा मोडीत काढतात. पण जगात आजही काही भाग विकासापासून वंचित आहेत. तिथे लोक हजारो वर्षांच्या परंपरांचे पालन करतात. ते जंगलात (forests) राहतात, आणि त्यांच्या आयुष्यात कोणी हस्तक्षेप (interference) केला तर ते सहन करत नाहीत. अशा भागांमध्ये जाऊन हस्तक्षेप करण्याचे अनेकदा सरकारही (Governments) टाळते. अशा भागात राहणाऱ्या जमाती या वर्षांनवर्षे चालत आलेल्या परंपरा पाळत असतात. इथिओपियाची ( Ethiopia ) मुर्सी जमातदेखील ( Mursi tribe ) अशीच एक जमात. पूर्व आफ्रिकेत राहणारी ही जमात जगातील सर्वात धोकादायक जमात मानली जाते. हे लोक कोणाचीही हत्या करायला मागेपुढे पाहत नाहीत. एखाद्याचा जीव घेणं ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कोणाला न मारता जगण्यापेक्षा स्वतः मरण बरं, असाच काहीसा त्यांचा फंडा आहे.

गायींच्या बदल्यात घेतात शस्त्र

मुर्सी जमातीची वस्ती दक्षिण इथिओपिया आणि सुदान सीमेवर असलेल्या ओमान खोऱ्यात आहे. त्यांची एकूण लोकसंख्या 10 हजारांच्या आसपास आहे. या जमातीत एखाद्याला मारणे हे पुरुषत्वाचे लक्षण मानलं जातं. या लोकांकडे अशी शस्त्रं असतात की ती क्षणार्धात कोणाचाही जीव घेऊ शकतात. ते फक्त जुन्या शस्त्रांनीच लढतात असे नाही. आता तर एके-47 (AK-47) सारखी आधुनिक शस्त्रे ही या जमातींकडे आहेत. ही शस्त्रे शेजारील देश सुदान आणि सोमालियामधून ते गायींच्या बदल्यात खरेदी करतात. 8-10 गायी दिल्यानंतर त्यांना जुने शस्त्र आणि 30-40 गायी दिल्यानंतर नवीन शस्त्र मिळते.

अमानवीय परंपरा

मुर्सी जमात तिच्या विचित्र व अमानविय परंपरेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या जमातीतील महिलांच्या खालच्या ओठात लाकडी किंवा मातीच्या डिस्क लावण्याची परंपरा अनेकवेळा चर्चेत येते. हे बॉडी मॉडिफिकेशन यासाठी केलं जातं की ती स्त्री कमी सुंदर दिसावी. याशिवाय या जमातीचे लोक प्राण्यांचे रक्तही पितात. एखाद्या उत्सवाच्या वेळी गाईचे रक्त पिण्याची परंपरा या जमातीत सुरू आहे. लग्नासाठीही येथे रक्तरंजित लढाई केली जाते. यामध्ये जी व्यक्ती जिंकते, त्याला सर्वात सुंदर पत्नी मिळते. या जमातीचे लोक इतके धोकादायक आहेत की त्यांच्या परवानगीशिवाय कोणी त्यांच्या भागात गेले, तर तो जिवंत परत येण्याची शक्यता कमीच असते. आज विविध क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आले असून मानव जातीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. परंतु आजही जगामध्ये असे काही भाग आहेत, तेथे राहणारे लोक हे विकासापासून, प्रगतीपासून दूरच आहेत. अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे आव्हान त्या-त्या देशातील सरकारसमोर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या