News18
Time stamp test
हरिकांत शर्मा, प्रतिनिधी
आग्रा, 13 डिसेंबर : स्वयंपाकघरातून फोडणीचा वास आला की, आहाहा…आज काहीतरी चमचमीत शिजतंय, असं आपण समजून जातो. फोडणी म्हणजे तेल, मोहरी, जिरा, कडीपत्ता, मिरची आणि हिंग. हिंगाच्या तर नुसत्या वासानेच भूक लागते. तुम्हाला माहितीये का, हिंग आयुर्वेदिक गुणांनी परिपूर्ण असतं. विविध आजारांवर ते फायदेशीर ठरतं. पोटासाठी तर रामबाण. याच औषधी गुणधर्मांमुळे आपल्या भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात हिंगाची आयात केली जाते. ही उलाढाल असते तब्बल 940 कोटींची. हा आकडा जितका मोठा आहे, तितकेच हिंगाचे फायदेही आहेत.