JOIN US
मराठी बातम्या / Viral / मोठमोठ्या बॉ़डी बिल्डरना टक्कर देतेय 24 वर्षांची तरुणी, VIDEO पाहून विश्वास बसणार नाही

मोठमोठ्या बॉ़डी बिल्डरना टक्कर देतेय 24 वर्षांची तरुणी, VIDEO पाहून विश्वास बसणार नाही

डेडलिफ्टवर 175 किलोग्रामचं वजन उचलणाऱ्या या 24 वर्षीय तरुणीचे व्हिडीओ एकदा पाहाच.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मॉस्को, 06 जुलै : कोरोनामुळं जवळजवळ सर्वच देशांमधील जिम बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळं फिटनेसची आवड असणारी लोकं घरातच व्यायाम करत आहे. यात बॉ़डी बिल्डर असणाऱ्यांना विशेष परिश्रम करावे लागत आहेत. मात्र एका 24 वर्षीय बॉ़डी बिल्डर तरुणीचे व्हिडीओ पाहून तुम्हाला व्यायाम करणं इतकं सोपं असतं? असा प्रश्न पडेल. सध्या सोशल मीडियावर या तरुणीच्या वर्क आऊटचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. रशियाची बॉ़डी बिल्डर असलेल्या या 24 वर्षीय तरुणीचे नाव ज्युलिया व्हिन्स (Julia Vins) आहे. ज्युलिया इन्स्टाग्रामवर आपल्या वर्क आऊटचे व्हिडीओ सतत अपलोड करत असतो. जवळजवळ तिचे 10 लाख फॉलोअर आहेत. तिचे व्हिडीओ सध्या मोठमोठ्या बॉ़डी बिल्डरना टक्कर देत आहेत. मात्र ज्युलिया बॉ़डी बिल्डर नसून पावर लिफ्टर आहे. तिचे व्हिडीओ पाहून अनेक लोकं प्रभावितही झाले आहेत. 1996मध्ये ज्युलियाचा जन्म झाला. तिनं वयाच्या 8व्या वर्षापासून पावर लिफ्टिंग करण्यास सुरुवात केली.

ज्युलिया आपला जास्तीत जास्त वेळ हा जिममध्ये घालवते. 24व्या वर्षी डेडलिफ्टवर 175 किलोग्रामचं वजन उचलणाऱ्या फार क्वचित मुलींपैकी ज्युलिया एक आहे.

जाहिरात

एवढेच नाही तर ज्युलियाच्या नावावर स्क्वाड आणि बेंच प्रेसमध्ये वर्ल्ड रेकॉर्डही आहे. सोशल मीडियावर ज्युलिया मसल बार्बी (Muscle Barbie) या नावानं प्रसिद्ध आहे.

जाहिरात

मात्र सध्या लॉकडाऊनमुळे ज्युलियाही घरात कैद झाली आहे. जिममध्ये जाता येत नसल्यामुळं ज्युलिया जास्तीत जास्त वेळ घरातच व्यायाम करते. तिनं स्वत:साठी घरातच एक जिमही तयार करून घेतली आहे. संपादन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या