JOIN US
मराठी बातम्या / Viral / अन् तिच्यासाठी कोरोना योद्धा डॉक्टर गायक झाला; हृदयस्पर्शी VIDEO एकदा पाहाच

अन् तिच्यासाठी कोरोना योद्धा डॉक्टर गायक झाला; हृदयस्पर्शी VIDEO एकदा पाहाच

इराकमधील एका डॉक्टरच्या (Iraq doctor) गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बगदाद, 10 जुलै : कोरोनाच्या (coroanvirus) या परिस्थितीत कोरोना रुग्णांना सेवा देताना डॉक्टर (doctor) स्वत: तणावात आहेत. मात्र तरीदेखील आपल्या रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न ते करतात आणि त्यासाठी ते आपल्या परीने शक्य ते सर्वकाही करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये कोरोना रुग्णांची सेवा करणारा एक डॉक्टर आपल्या रुग्णासाठी गायकही झाला आहे. इराकमधील (Iraq) अशात एका कोरोना योद्धा (Corona warriors) डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे. यामध्ये एका वयोवृद्ध महिला आहे, जिला कोरोनाची लागण झाली आहे. तिच्यासाठी हा डॉक्टर गाताना दिसतो आहे.

संबंधित बातम्या

इतकंच नव्हे तर व्हिडीओचा शेवटचा क्षण पाहाल तर तुमच्या डोळ्यात चटकन पाणीच येईल. आपल्या आईच्या डोक्यावर जसं आपण प्रेमानं चुंबन घ्यावं, तसंच या डॉक्टरनंही घेतलं आहे. यानंतर मात्र या महिलेला आपल्या अश्रूंना आवर घालता आला नाही. हे वाचा -  VIDEO - आधी उपचार मग म्युझिक; ड्युटी संपल्यावर कोरोना रुग्णांसाठी नर्स वाजवते वायोलिन कोरोनाने प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण केली आहे. थेट कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची परिस्थिती काय असेल याची आपण कल्पानाही करू शकत नाही. कित्येक तास आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपला जीव धोक्यात घालून हे डॉक्टर कोरोना रुग्णांची मनापासून सेवा करत आहेत. कामाचा ताण शिवाय दिवसभर पॅकबंद असं कोरोना सूट घालून कोरोना रुग्णांसाठी ते लढत आहेत. अशा परिस्थितीतही कोरोना योद्धा रुग्णसेवेत तसूभरही कसर सोडत नाहीत. आपल्या परीने जे काही करता येईल ते करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या