JOIN US
मराठी बातम्या / Viral / एकीचे बळ! म्हशींच्या कळपासमोर जंगलाच्या राजाला काढावा लागला पळ, VIDEO VIRAL

एकीचे बळ! म्हशींच्या कळपासमोर जंगलाच्या राजाला काढावा लागला पळ, VIDEO VIRAL

आतापर्यंत 7 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 जुलै: आपल्या एका आवाजानं जंगल हादरवून टाकणाऱ्या राजाला मात्र एकीचं बळ चांगलंच भोवलं आहे. म्हशींच्या कळपासमोर त्याला हार मानावी लागली. इतरवेळी म्हैस सिंहाला पाहून घाबरते आणि पळ काढते मात्र आज म्हशीच्या कळपानं सिंह आणि सिंहीणीला पळवून लावल्याचा दुर्मीळ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता. एक दोन वेळा सिंह म्हशीवर हल्ला करण्याचादेखील प्रयत्न करतो मात्र हा त्याला महागात पडतं. एकजुटीनं म्हशींचा कळप सिंहावर धावून येतो आणि सिंहाला सिंहीणीसोबत पळ तिथून पळ काढावा लागतो. सिंह आपला जीव मुठीत घेऊन पळत सुटतो. या म्हशींच्या एकीजुटीसमोर त्यालाही नमतं घ्यावं लागतं.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात

हे वाचा- शेवटी आईचं प्रेम ते…चिंपाजीनं बछड्याला पाजलं दूध, VIDEO VIRAL IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवर ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये जंगलाचा राजा, सिंह आणि सिंहीण, म्हशींच्या कळपाला घाबरुन पळून जाताना दिसत आहेत. इतकेच नाही तर सिंह जेव्हा त्या म्हशींवर गर्जना करतो तेव्हा त्याला न घाबरता म्हशींचा कळप त्याच्यावर धावून जातात. आतापर्यंत 7 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. एकीच बळ, म्हशींच्या कळपानं केलेल्या हिमतीला अनेक युझर्सनी दाद दिली आहे. एकीजुटीचं बळ केवढं मोठं असतं हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या