JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'मी खूप सुंदर आहे माझ्या सारख्या मुलांना जन्म द्या'; मॉडेलची अजब ऑफर ऐकून बसेल धक्का

'मी खूप सुंदर आहे माझ्या सारख्या मुलांना जन्म द्या'; मॉडेलची अजब ऑफर ऐकून बसेल धक्का

आजकाल अनेक धक्कादायक बातम्या समोर येतात. कधी काय समोर येईल, कोण काय करेल याचा काहीच नेम नाही.

जाहिरात

मॉडेल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जानेवारी : आजकाल अनेक धक्कादायक बातम्या समोर येतात. कधी काय समोर येईल, कोण काय करेल याचा काहीच नेम नाही. अनेक लोक पैसे कमावण्यासाठी काय काय शक्कल लढवतील याचा विचारही आपण कधी केला नसेल. अशीच काहीशी शक्कल एका मॉडेलने लढवली असल्याचं समोर आलं आहे. पैशासाठी एका मॉडेलने एक अनोखी ऑफर ठेवली असून तुम्हालाही ऐकून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एका मॉडेलने पैसे कमावण्यासाठी अनोखी ऑफर ठेवली आहे. मॉडेल आणि अभिनेत्री एलाचा दावा आहे की ती खूप सुंदर आहे आणि तिला तिचे अद्भुत जीन्स आणखी पुढे वाढवायचे आहेत. यासाठी ती एक अशी ऑफर देत आहे जी तुम्ही आजवर क्वचितच पाहिली किंवा ऐकली असेल. टेक्सास, यूएसए येथे राहणारी एला एक ब्लॉगर, मॉडेल आहे आणि ती तिच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाने खूप प्रभावित आहे. याच कारणामुळे तिला जगात तिच्यासारखे आणखी लोक हवे आहेत. यासाठीच तिने एक अजब ऑफर ठेवली आहे.

संबंधित बातम्या

एला म्हणते की तिला स्वतःच्या कोणत्याही मुलाला जन्म द्यायचा नाही, पण तिच्यासारखी अद्भूत जीन्स असलेली आणखी मुले या जगात यावीत अशी तिची इच्छा आहे. अशा परिस्थितीत एलाने तिचे एग्ज विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तिने तिच्या वेबसाइटवर ‘गेट माय एग्ज’ नावाची ऑफर दिली आहे. तिने पैशाच्या बदल्यात अंडी विकण्याची ऑफर दिली आहे. यामध्ये तुमच्या पूर्वजांची माहिती आणि वैद्यकीय अहवालांसह सर्व महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. या प्रकरणी मी काही लोकांशी बोलत असल्याचेही तीने सांगितले.

एला केवळ सुंदरच नाही, तर मॉडेलिंग आणि डॉक्युमेंटरी मेकिंगही करते. अभिनयाव्यतिरिक्त तिला नृत्य आणि चित्रकलेची आवड आहे, तर ती जलद टाइप करू शकते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असून पैसे कमावण्यासाठी ती डेटिंग आणि व्हिडिओ चॅटचे कामही करते. अलीकडेच ती चर्चेत आली होती. कारण तिने स्वतःसाठी एक चांगला जोडीदार शोधण्यासाठी 60 प्रश्नांची प्रश्नावलीही तयार केली होती. तीचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. सध्या ती अनोख्या ऑफरमुळे चर्चेत आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या