भररस्त्यात व्हिडीओ कोच भरभर पेटू लागली..कोणाला काही कळायच्या आतच परिसरात काळा धूर पसरला.
जयपूर-दिल्ली हायवेवरुन अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एक बसचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बस भराभर पेटू लागली.
बस पेट घेतल्याचे पाहून स्थानिक तातडीने मदतीसाठी धावले. अनेकांना पटापट बसमधून काढण्याचा प्रयत्न सुरू होता.
बसमधून आगीच्या ज्वाला पाहून सर्वांनाचा धस्स झालं. प्रवाशांनी भरलेल्या व्हिडीओ कोचचा अपघात झाला. त्याचवेळी बसमध्ये करंट पसरला व त्यात आगीने पेट घेतला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 12 जणं गंभीर आहेत.
जखमींना स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात हलविले. अपघातातनंतर बराच वेळ त्या भागात धुराचं साम्राज्य होतं.
या आगीत व्हिडीओ कोच जळून खाक झाली आहे. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. दरम्यान फायब्रिगेडला बोलावून आग विझविण्याचे काम बराच वेळ सुरू होते.