JOIN US
मराठी बातम्या / Viral / Shocking Video : मादी कुत्र्यासोबत खेळायला यायचा भटका कुत्रा; तरुणाने काठीने मारून जीवच घेतला

Shocking Video : मादी कुत्र्यासोबत खेळायला यायचा भटका कुत्रा; तरुणाने काठीने मारून जीवच घेतला

केवळ काठीनेच नाही तर दगडाने ठेचून त्याने कुत्र्याचा जीव घेतला. या घटनेचा धक्कादायक VIDEO व्हायरल झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदूर, 6 जानेवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Gwalior) ग्वाल्हेरमधील एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. यामध्ये एका तरुणाने कुत्र्याला काठीने बेदम मारहाण केली आणि नंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केला. हा व्हिडीओ हजीरा येथील न्यू नरसिंग नगर येथील असून बंटी बैस असं मारलेल्या तरुणाचे नाव आहे. हा रस्त्यावरचा कुत्रा बंटीच्या मादी कुत्र्यासोबत खेळायला यायचा. बंटीने त्याचा अनेकवेळा पाठलाग केला होता. यानंतरही तो वारंवार यायचा. यामुळे त्याने स्ट्रीट डॉगवरच राग काढला. त्याला इतका मारला की तो बेशुद्ध झाला. त्यानंतर मोठ्या दगडाने त्याचा जबडा फोडून त्याची हत्या केली. बुधवारी ही बाब समोर आली आहे.

संबंधित बातम्या

या प्रकरणी प्राणी क्रूरता कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे. छाया तोमर नावाच्या एका प्राणीप्रेमीने हजिरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी रितसर तक्रारही केली आहे. फुटेजच्या आधारे कुत्र्याला मारणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती हजिरा पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी दिली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यापैकी कोण प्राणी आहे, याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. इतक्या क्रूरपणे या कुत्र्याला मारण्यात आलं. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका मुक्या जनावराला अशा प्रकारची वागणूक देणं हे मानवतेला शोभणारं नाही. अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात तरुणावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या