मुंबई, २४ ऑगस्ट: शरीरयष्टीवरून बऱ्याचदा चिडवलं किंवा डिवचलं जातं. असे प्रकार अनेकदा समोर येतात. पण चक्क एका व्यक्तीला तू जाड आहेस म्हणून त्याच्या गर्लफ्रेंडनं डिवचलं आणि ब्रेकअप केलं. गर्लफ्रेंडचं जाणं त्याला सहन झालं नाही. त्यानंतर त्याने एक प्रण केला. गर्लफ्रेंडचं बोलणं जिव्हारी लागलं म्हणून त्याने एक दोन नाही तर तब्बल ७० किलो वजन कमी केलं. अनेकदा गलेलठ्ठपणा हा नात्यावरही परिणाम करणारा ठरतो. त्यामुळे नातं तुटतं असाच प्रकार एका व्यक्तीसोबत झाला. सध्या त्याची जगभरात चर्चा होत आहे. गर्लफ्रेंडने त्याला तू खूप जास्त लठ्ठ झाला आहेस म्हणत त्याच्यासोबतचं नातं तोडलं. ब्रेकअप केल्यानंतर हा व्यक्ती खूप जास्त दुखावला गेला. हा व्यक्ती टिकटॉक स्टार असल्याची माहिती मिळाली आहे. कसं शक्य आहे? स्वतःच्या अंत्यसंस्कारात आली आणि सर्वांसोबत गप्पा मारू लागली; पाहा मृत महिलेचा LIVE VIDEO गर्लफ्रेंडचे शब्द लागले आणि त्याने ७० किलो वजन कमी केलं. सध्या या स्टारची जगभरात चर्चा होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार या व्यक्तीचं नाव पुवी असल्याचे सांगितलं जात आहे. एकेकाळी त्याचं वजन 139 किलो होतं. आज त्याने 70 किलो वजन कमी करून 69 किलो केलं आहे. पुवीने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या फिटनेस प्रवासाविषयी माहिती दिली. जास्त वजन असल्याने पुवी नेहमी जॅकट घालायचा. तरीही तो गलेलठ्ठ दिसायचा. त्याच्या गर्लफ्रेंडने शेवटी त्याला गलेलठ्ठपणाला कंटाळून ब्रेकअप केलं. ते पुवीच्या जिव्हारी लागलं. त्याने स्वत:ला फिट ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने आपली लाईफस्टाईल बदलून टाकली. पुवीने स्वत:ला एवढं फिट केलं की पाहणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसेल. त्याने आपले एब्स देखील टिकटॉकवर शेअर केले आहेत. त्याने आपली फिटनेस जर्नी सोशल मीडियावर शेअर केली. त्याचा हा बदलेला लूक पाहून सोडून गेलेल्या गर्लफ्रेंडलाही मोठा धक्का बसला असेल. सध्या पुवीची जगभरात चर्चा होत आहे.