Trending Video In Hindi: सध्या सोशल मीडियावर (Viral Video On Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्याशिवाय मनोरंजक व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. जे नेटकरी एन्जॉय करतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती डोळ्यात डोळे घालून चक्क खोटं बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये व्यक्तीला खोटं बोलताना पाहून नेटकरी मजेशीर रिअॅक्शन देत आहेत. नेटकरी हा व्हिडीओ एन्जॉय करीत आहेत. या व्हिडीओमध्ये व्यक्तीला त्याच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यात ट्रेन ऑफर केली होती असं तो सांगत होते. ज्याशिवाय हे सर्व सत्य असल्याचंही तो म्हणतो. दुसरी व्यक्ती त्याला विचारते की, ट्रेन का घेतली नाहीस? यावर ती व्यक्ती म्हणते की, मला ट्रेन चालवता येत नाही. म्हणून नकार दिला. याशिवाय ट्रेन उभी करायला जागाही नाही. त्यामुळे ट्रेन घेण्यास नकार दिल्याचं तो सांगतो.
सध्या हा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 8 लाख 24 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक नेटकरी म्हणाला..हा फेका आणि लपेटत आहोत. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने त्याच्याच अंदाजात म्हटलं की, मलाही हुंड्यात एक रॉकेट मिळणार होतं, हवं तर घेऊशी शकलो असतो. मात्र बाईकवर फिरण्याची वेगळीच मजा आहे.