पंतप्रधानांच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल,
हेलसिंकी, 18 ऑगस्ट : पंतप्रधान जे देशाचे प्रमुख असतात. देशातील नागरिकांचे ते कुटुंबप्रमुख. देशाला संबोधित करताना, जगातील बड्याबड्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसतात. पण सध्या अशा पंतप्रधानांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्या मित्रमैत्रिणींसोबत दारू पार्टी करताना दिसल्या. या पंतप्रधानांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन चक्क पार्टीत दारू पिऊन, डान्स करत धिंगाणा घालताना दिसल्या. सना मरीन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. नुकतंच जर्मन न्यूज आऊटलेट बिल्डने सना यांना जगातील सर्वाधिक कुलेस्ट प्राइम मिनिस्टर म्हटलं होतं. बऱ्याच पार्टीमध्ये मजामस्ती करताना त्या दिसल्या आहेत. गेल्या वर्षी क्लबमध्ये गेल्याने त्यांनी माफीही मागितली होती कारण त्यावेळी त्या एका कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आल्या होत्या. नुकताच त्यांच्या एका पार्टीतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हे वाचा - ‘10 मुलं जन्माला घालणाऱ्या महिलांना मिळणार 13 लाख रुपये’, सरकारने दिली अजब ऑफर कारण… @visegrad24 ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहू शकता, ज्यात त्या आपल्या काही मित्रमैत्रिणींसोबत नाचताना, गाताना दिसत आहे. या पार्टीत असलेल्या एका व्यक्तीनेच हा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. जो तुफान व्हायरल झाला. विरोधी पक्षाने या व्हिडीओवरून त्यांना लक्ष्य केलं आहे आणि त्यांची ड्रग टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
रिपोर्ट नुसार या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण देताना सना मरीन म्हणाल्या, “कुणीतरी आपला व्हिडीओ बनवत आहे हे आपल्याला माहिती होतं, पण हा व्हिडीओ सार्वजनिक केल्याने मला वाईट वाटतचं आहे. मी पार्टी केली, पार्टीत डान्स केला, गाणं गायलं. हे सर्वकाही कायदेशीर आहे. आपण फक्त दारूचं सेवन केलं. मी कधीच ड्रग्जचं सेवन केलं नाही किंवा ड्रग्ज घेणाऱ्याला मी ओळखतही नाही” हे वाचा - तिचा गुन्हा इतकाच की Tweet केलं! ‘त्या’ ट्विटमुळे महिलेला 34 वर्षांचा तुरुंगवास, काय आहे प्रकरण? “माझं एक कौटुंबिक आयुष्य आहे आणि एक प्रोफेशनल. जेव्हा थोडासा वेळ मिळतो तेव्हा मित्रमैत्रिणींसोबत घालवते. मला माझ्या वागणुकीत कोणताही बदल करण्याची गरज नाही. मी जसे होते, तसेच कायम राहणार”, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.