JOIN US
मराठी बातम्या / Viral / Fevicol की Alcohol, बाँडिंगसाठी काय उत्तम? Harsh Goenka यांना पडला प्रश्न; तुम्हाला काय वाटतं?

Fevicol की Alcohol, बाँडिंगसाठी काय उत्तम? Harsh Goenka यांना पडला प्रश्न; तुम्हाला काय वाटतं?

Fevicol की Alcohol बाँडिंगसाठी काय उत्तम? हर्ष गोयंका यांच्या (Harsh Goenka) या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर आहे का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 फेब्रुवारी : उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) आपल्या सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात. नेहमी काही ना काही मजेशीर पोस्ट आणि व्हिडीओ ते शेअर करत असतात. अशीच त्यांची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. जी खूप व्हायरल होते आहे. यामध्ये हर्ष गोयंका यांना एक प्रश्न पडला आहे आणि त्यांनी याबाबत सोशल मीडियावर विचारणा केली आहे. त्यानंतर यावर भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. हर्ष गोयंका यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी फेव्हिकॉल आणि अल्कोहोल म्हणजे दारूचा उल्लेख केला आहे. त्यांनी मजेशीर अंदाजात विचारलं आहे की, ‘बाँडिगसाठी काय उत्तम आहे? फेव्हिकॉल की अल्कोहोल?’

हर्ष गोयंका यांना पडलेला हा प्रश्न पाहून त्यावर बऱ्याच नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अगदी ज्या कंपनीबाबत हा प्रश्न विचारण्यात आला आहे त्या कंपनीने हर्ष गोयंका यांच्या मजेशीर प्रश्नाचं त्याच मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे.

फेव्हिकॉल कंपनीने हर्ष गोयंका यांच्या या ट्विटला रिप्लाय दिला आहे. आपल्या परीने त्यांच्या प्रश्नाच निरसन केलं आहे. कंपनीने ट्विट केलं आहे की, एका संध्याकाळची की आयुष्यभराची, तुम्हाला कशी बाँडिंग हवी हे तुमच्यावर अवलंबून आहे.हर्ष यांच्या प्रश्नासह त्यावर कंपनीच्या या भन्नाट उत्तरानेही सर्वांचं मन जिंकलं आहे. हे वाचा -  Smoking सोडण्याचा असाही फायदा! कंगाल तरुणाचं नशीब फळफळलं; आज आहे लखपती कंपनी आणि नेटिझन्सनी हर्ष गोयंका या प्रश्नाचं उत्तर तर दिलं आहे. पण तुमचं याबाबत काय मत आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या