JOIN US
मराठी बातम्या / Viral / नशेत आऊट ऑफ कंट्रोल व्यक्तींसोबत घडलं धक्कादायक.... CCTV VIDEO व्हायरल

नशेत आऊट ऑफ कंट्रोल व्यक्तींसोबत घडलं धक्कादायक.... CCTV VIDEO व्हायरल

आपल्या आरोग्यासाठी दारु, तंबाखू, सिगारेट, या गोष्टी हानिकारक असतात. हे माहिती असतानाही अनेक लोक याचं सेवन करतात.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 जानेवारी : आपल्या आरोग्यासाठी दारु, तंबाखू, सिगारेट, या गोष्टी हानिकारक असतात. हे माहिती असतानाही अनेक लोक याचं सेवन करतात. नशेत लोक काय करतात हे त्यांचं त्यांनाच कित्येकदा माहित नसतं. नशेमध्ये लोकांसोबत अपघातही घडताना पहायला मिळतात. सोशल मीडियावरही याचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच नशेत असलेल्या तरुणांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. नशेमध्ये त्यांच्यासोबतही अपघात घडल्याचं पहायला मिळालं. सोशल मीडियावर सध्या दोन नशेत असलेल्या तरुणांचा व्हिडीओ लक्ष वेधत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे, दोन तरुण नशेच्या अवस्थेच लिफ्टकडे चालले आहेत. दोघेही एकमेकांचा अधार घेत पुढे चालले आहेत. तेवढ्यात त्यांचा तोल जातो आणि तो लिफ्टवर कोसळतात. त्यांच्यामुळे लिफ्टचा दरवाजाही तुटतो आणि ते लिफ्टमध्ये जातात. त्यानंतर नशेतील तरुणांना बाहेर काढण्यासाठी लोक तिथे जमा होतात. शेवटी त्या तरुणांना बाहेर काढण्यात तेथील गार्ड्सना यश येते.

संबंधित बातम्या

ही संपूर्ण घटना तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या कैद झाली आहे. या तरुणांचा 35 सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत असून व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट येत आहेत. @CapturedCctv या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही क्षणातच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.

दरम्यान, नशेत कोणासोबत असं काही घडण्याची आणि व्हिडीओ व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत असतात. असे व्हिडीओ अनेकवेळा पाहिले गेल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या