JOIN US
मराठी बातम्या / Viral / Cyber fraud : अनोळखी नंबरवरून सतत मिस्ड कॉल व्हा सावध; एकाला लाखो रुपयांना फसवलं

Cyber fraud : अनोळखी नंबरवरून सतत मिस्ड कॉल व्हा सावध; एकाला लाखो रुपयांना फसवलं

सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दैनंदिन आयुष्यातल्या अनेक गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे व्यवहार सोपे होण्यास मदत झाली

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दैनंदिन आयुष्यातल्या अनेक गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे व्यवहार सोपे होण्यास मदत झाली आहे; मात्र याचे अनेक तोटेही आहेत. डिजिटायझेशनमुळे सायबर क्राइम आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाइन फसवणुकीसाठी विविध युक्त्या शोधून काढल्या जातात.

अशाच घटनांचं चित्रण करणारी ‘जामतारा’ नावाची सायबर क्राइम वेबसीरिज लोकप्रिय आहे. झारखंडमधल्या ‘जामतारा’ नावाच्या आदिवासी जिल्ह्यातल्या गुन्ह्यांवर आधारित ही एक सत्यकथा आहे. ‘जामतारा’शी साम्य असलेली फसवणुकीची एक घटना पुन्हा उघडकीस आली आहे. या घटनेत एका व्यक्तीला अनेक मिस्ड कॉल देऊन तिच्या खात्यातले 50 लाख रुपये लंपास करण्यात आले. ‘झी न्यूज’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा :  लेट नाईट फिरणाऱ्या कपलला लावला दंड; एका ट्विटने प्रकरण पोलिसांवरच उलटलं

समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आरोपींनी दिल्लीतल्या एका सिक्युरिटी सर्व्हिस फर्मच्या संचालकाला बळी बनवलं आहे. फसव्या हस्तांतरणाद्वारे या संचालकाची 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपींनी वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) न विचारताच पीडित व्यक्तीच्या खात्यातून पैसे हस्तांतरित करून घेतले आहेत. त्यासाठी त्यांनी या व्यक्तीच्या मोबाइलवर वारंवार मिस्ड कॉल दिले होते.

संबंधित बातम्या

ही घटना 10 ऑक्टोबर रोजी घडली. संध्याकाळी 7 ते 8 वाजून 44 मिनिटांदरम्यान एका सिक्युरिटी सर्व्हिस फर्मच्या संचालकाच्या मोबाइल फोनवर अनेक मिस्ड कॉल आले होते. या संचालकांनी काही कॉल उचलले, तर काहींकडे दुर्लक्ष केलं. यानंतर बँकेकडून पैसे ट्रान्सफर झाल्याचे मेसेज मोबाइलवर मिळाले. या संचालकांच्या कंपनीच्या चालू खात्यातून एकूण 50 लाखांहून अधिक रकमेचे फसवे आरटीजीएस व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  आईला फोन केला म्हणून… बापाचं पोटच्या मुलीसोबत निर्दयी कृत्य, बीड हादरलं

ही घटना ‘जामतारा’ या प्रसिद्ध वेब सीरिजसारखीच आहे. या लोकप्रिय सीरिजमध्ये, झारखंडच्या जामतारा जिल्ह्यातली किशोरवयीन आणि तरुण मुलं देशभरातल्या खात्यांमधून पैसे काढण्यासाठी फसवे कॉल आणि मेसेज करून सायबर क्राइम करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. विविध प्रकारची आमिषं दाखवून देशाच्या विविध भागातल्या नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा गुन्हेगारी व्यवसाय संपूर्ण जिल्ह्यात किती खोलवर रुजला आहे, हे या सीरिजच्या माध्यमातून समोर मांडण्यात आलं आहे. सतत अनोळखी क्रमांकावरून मिस्ड कॉल येत असतील तर तुम्हीदेखील वेळीच सावध व्हा, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या