JOIN US
मराठी बातम्या / Viral / लहान मुलाने खेळता खेळता दिली खाण्याची ऑर्डर, बिल आल्यावर वडिलांना बसला धक्का

लहान मुलाने खेळता खेळता दिली खाण्याची ऑर्डर, बिल आल्यावर वडिलांना बसला धक्का

आजच्या इंटरनेटच्या जगात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच स्मार्ट फोनचा वापर करताना दिसतात. जास्त करुन लहान मुलांच्या हातात सर्रास मोबाईल फोन आढळतात.

जाहिरात

ऑनलाईन फूड

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : आजच्या इंटरनेटच्या जगात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच स्मार्ट फोनचा वापर करताना दिसतात. जास्त करुन लहान मुलांच्या हातात सर्रास मोबाईल फोन आढळतात. कारण लहान मुलं-मुली रडायला लागली की, त्यांना नादवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल टेकवला जातो. अनेकवेळा याच्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. मोबाईल जरी मुलाला द्यायचा असला तरी तो त्याच्या देखरेखीखाली वापरण्यासाठी द्यावा. अन्यथा अनेक वाईट गोष्टी घडू शकतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर येत असून एका व्यक्तीने मुलाला खेळण्यासाठी मोबाईल दिला अन् पुढे जे घडलं ते धक्कादायकच. कीथ स्टोनहाऊसने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून या घटनेविषयी सांगितलं आहे. त्यांच्या मुलाने 82233.50 रुपये किंमतीचे अन्न ऑर्डर केले होते. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘काल रात्री डिलिव्हरी ड्रायव्हरने माझ्या दारात जेवण सोडले तेव्हा मला धक्का बसला. मग शेवटी मी त्याच्याशी त्याच्याबद्दल थोडे बोललो. एवढं करुन पेपरोनीवे पिझ्झा अजून आला आहे का हे विचारण्याची हिम्मत केली.

संबंधित बातम्या

स्टोनहाऊसने पुढे लिहिले, ‘जर तुम्हाला भूक लागली असेल आणि अनेक ऑर्डर घेण्याच्या मूडमध्ये असाल तर तुम्ही SMH द्वारे स्विंग करू शकता आणि जंबो कोळंबी 5, सॅलड, 3 हनी, चिली चीज फ्राईज, तुम्ही ऑर्डर करू शकता. चिकन शावरमा सँडविच आणि आईस्क्रीमन पण ऑर्डर करु शकता. ही पोस्ट अपलोड झाल्यापासून अनेकांनी त्याला लाईक केले आहे आणि काही कमेंट्सही केल्या आहेत. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून याविषयी चर्चा रंगली आहे. पोस्टवर विविध प्रतिक्रियाही पहायला मिळत आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मोबाईल मुलांच्या हाती देत असाल तर त्यांच्यावर लक्ष ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या