न्यूयॉर्क, 25 मे : कोरोनाच्या संकटात काही लोकं आपल्या कुटुंबासोबत आहेत तर काहींनी गेले कित्येक महिने आपल्या घरच्यांना पाहिलेही नाही आहे. मात्र जर 70 वर्ष एकत्र राहिलेल्या एका जोडप्याला महिनाभरासाठी वेगळं केलं तर त्यांची काय अवस्था हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील अमेरिकेतील एक कपल जीन (89) आणि वॉल्टर (91) यांच्या लग्नाला 70 वर्ष झाल्यानंतर त्यांची तटातून झाली. कोरोनामुळं पहिल्यांदाच 70 वर्षात दोघं एकटे पडले. जीन आणि वॉल्टर यांच्या मुलीनं दिलेल्या माहितीनुसार, ते दोघं एकमेकांसोबत खुप जास्त आनंदी होते. मात्र एकेदिवशी जीन पायघसरून पडल्या. या अपघातामुळं त्यांचे पेल्विस तुटले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना स्मृतीभ्रंष झाल्याचे कळले. हळुहळु जीन सर्व गोष्टी विसरू लागल्या. मात्र वॉल्टर यांचे प्रेम कमी झाले नाही. ते रोज जीन यांचा भेटण्यासाठी रुग्णालयात जायचे. त्यांची मुलगी वेंडीने सांगितले की, वॉल्टर जास्तीत जास्त वेळ जीन यांच्यासोबत घालवत असतं. सकाळपासून रात्रीपर्यंत जीन यांच्या शेजारी बसून राहायचे. मात्र अचानक कोरोना आला आणि जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यात वॉल्टर वृद्ध असल्यामुळं त्यांना घरातून बाहेर जाण्यास मनाई होती. त्यामुळं महिनाभर वॉल्टर आणि जीन यांची भेट झाली आहे.
दरम्यान, या सगळ्यात एकेदिवशी वॉल्टरही पाय घसरून पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली. वॉल्टर यांना जीन असलेल्या नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आलं. अखेर तिथं त्यांची भेट झाली. एकमेकांना भेटल्यानंतर दोघांना अश्रु अनावर झाले होते. या व्हिडीओमध्ये जीन आणि वॉल्टर एकमेकांची खुप आठवण येत होती, असे सांगत रडताना दिसत आहेत. एकमेकांचा हात पकडून किसही करत आहेत. हा व्हिडीओ पाहून खरं प्रेम काय असतं, याचा प्रत्यय येतो.