इंदूर, 05 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार पसरला आहे. आतापर्यंत 3 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. याच कालावधीमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या महासंकटाच्या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपलं काम करत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत याचा मोठा वाटा आहे. याच दरम्यान एक फोटो शनिवारपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो आपण पाहिला तर डोळ्यात पाणी आणणारं दृशं आहे. पोलीस आपल्या घरापासून दूर काही अंतरावर बसून जेवण करत आहे आणि दारात त्याची चिमुकली मुलगी त्याला पाहात आहे. पोलीसही आपल्या निरागस मुलीकडे पाहून आपलं जेवण करत आहे. नि:शब्द करणारा हा फोटो आहे. आपल्यामुळे कुटुंबियांना त्रास होऊ नये. आपल्या घरापर्यंत हे कोरोनाचं महासंकट पोहोचू नये यासाठीही पोलीस अधिकारी तेवढीच काळजी घेत आहेत.
इंदूरच्या तुकोगंज पोलिस स्टेशनचे टीआय निर्मल श्रीवास यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. टीआय निर्मल श्रीवास घराबाहेर बसून जेवताना दिसला. ते तिथे बसून आपल्या मुलीकडे पाहात आहे. श्रीनीवास यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचं तुफान कौतुक केलं. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशातील अयोध्याचे एसएसपी आशिष तिवारी यांनीही श्रीवास यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. याआधी भोपाळमधील डॉक्टरांचा असाच एक फोटो व्हायरल झाला होता. कोरोनाग्रस्त रुग्णांची काळजी घेणारे डॉक्टर आपल्या घरापासून काही अंतर लांब राहून चाहा पीत होते. आपल्या कुटुंबापर्यंत या महासंकटाला येऊ न देणं आणि त्याचं देशातील नागरिकांप्रमाणेच रक्षण करणं महत्त्वाचं आहे.!function(e,i,n,s){var t=“InfogramEmbeds”,d=e.getElementsByTagName(“script”)[0];if(window[t]&&window[t].initialized)window[t].process&&window[t].process();else if(!e.getElementById(n)){var o=e.createElement(“script”);o.async=1,o.id=n,o.src=“https://e.infogram.com/js/dist/embed-loader-min.js",d.parentNode.insertBefore(o,d)}}(document,0,"infogram-async");